शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

नृत्याची धम्माल... वैशालीच्या गीतांची कमाल!

By admin | Updated: December 1, 2014 02:03 IST

‘ऐका दाजीबा’फेम प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या सुरेल गीतांवर प्रेक्षकांनी अख्खे स्टेडियम डोक्यावर घेतले

नागपूर : ‘ऐका दाजीबा’फेम प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या सुरेल गीतांवर प्रेक्षकांनी अख्खे स्टेडियम डोक्यावर घेतले. त्यात अभिनेत्री प्राची देसाई हिची उपस्थिती अन् लोकमत सखी मंच व कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘आंतरराज्यीय धमाल दांडिया’ स्पर्धेची अंतिम फेरी, अशा रंगारंग कार्यक्रमाची मेजवानी नागपूरकरांना शनिवारी मिळाली.खच्चून भरलेल्या चिटणीस पार्क मैदानावरील १० हजाराहून अधिक प्रेक्षक तब्बल चार तास वैशाली सामंतच्या गाण्यावर व धमाल दांडियाच्या तालावार थिरकले. स्पर्धेचे परीक्षक असलेले स्टार प्रवाहवरील जयोस्तुते मालिकेचे निर्माता महेश कोठारे, अभिनेत्री सुरेखा कुडची, श्वेता शिंदे व जुई गडकरी यांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला. लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा, मातोश्री वीणादेवी दर्डा व लोकमत सखी मंचच्या अध्यक्षा दिवंगत ज्योत्स्ना दर्डा यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते मालार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्र्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन, खासदार विजय दर्डा, प्राची देसाई, वैशाली सामंत, कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशीकांत बोदड, आरती बोदड, सनेनिर्माता महेश कोठारे, सुरेखा कुडची, श्वेता शिंदे व जुई गडकरी, लोकमत समूहाचे संचालक (परिचालन) अशोक जैन, उद्योगपती दिलीप छाजेड, जैन सहेली मंडळाच्या अध्यक्षा माधुरी बोरा, कोषाध्यक्ष अनुजा छाजेड आदी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक रायसोनी ग्रुप आॅफ एज्युकेशन तर पारितोषिक प्रायोजक ‘युनिक स्लीम पॉर्इंट अ‍ॅण्ड ब्युटी क्लिनिक’ हे होते. (प्रतिनिधी)