शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

डम्पिंगमुळे श्वास गुदमरतोय, कन्नमवारनगर, टागोरनगर आणि कांजूरवासीय त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 02:00 IST

मुंबई शहर आणि उपनगरातील प्रदूषणाचे प्रमाण दिवसागणिक वाढत असतानाच आता पूर्व उपनगरातील कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

कुलदीप घायवटमुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील प्रदूषणाचे प्रमाण दिवसागणिक वाढत असतानाच आता पूर्व उपनगरातील कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. येथील डम्पिंग ग्राउंडवर पुनर्प्रक्रिया न करता कचरा टाकला जात असून, कचºयाच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. महत्त्वाचे म्हणजे मुंबई महापालिकेकडे याबाबत वारंवार तक्रार करूनही काहीच कार्यवाही होत नसल्याने कन्नमवारनगर, टागोरनगर आणि कांजूरमार्ग येथील रहिवाशांचा श्वास कोंडला आहे. परिणामी संतप्त रहिवाशांनी ‘डम्पिंग हटाओ’ ही मोहीम हाती घेतली असून, हा प्रश्न कायमचा निकाली लावला नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.कांजूर डम्पिंग ग्राउंडमुळे स्थानिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मुंबईतील वेगवेगळ्या विभागांतून येणारा कचरा कांजूर डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकण्यात येत आहे. त्यामुळे येथील आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरत आहे. हवेमार्फत सर्वदूर कचºयाची दुर्गंधी पसरली जाते. त्यामुळे येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कचºयावर योग्य ती प्रक्रिया करून कचरा डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. परंतु कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता कचरा टाकला जातो. त्यातून निर्माण होणाºया दूषित हवेमुळे कन्नमवारनगर, टागोरनगर, कांजूरमार्ग येथील नागरिकांना त्रास होऊन दूषित हवेमुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी निर्माण होते. महत्त्वाचे म्हणजे नागरिकांना श्वसन करण्यास त्रास होत आहे. अनेकांना दमा, खोकला यासारखे आजार झाले आहेत. तसेच या कचºयामुळे मलेरिया, डेंग्यूसारखे आजार पसरवणाºया डासांची पैदास होते. त्यामुळे आजारांना आमंत्रण मिळते, असे पर्यावरणतज्ज्ञांनी सांगितले.गेल्या अनेक वर्षांपासून येथील स्थानिक रहिवासी कांजूरमधील कचरा डेपोविरोधात लढा देत आहेत. नागरी वस्तीपासून काही मिनिटांच्या अंतरावर शहरातील सर्वांत मोठा कचरा डेपो सुरू करून महापालिका नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. सर्व राजकीय पक्षांचे नेते आश्वासन देत आहेत. पण यावर कोणतीही सकारात्मक ठोस पावले उचलली जात नाही, असे येथील रहिवाशांनी सांगितले. कचरा टाकताना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कोणत्याही आदेशांचे पालन केले जात नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना जीव मुठीत ठेवून जगावे लागत आहे. ३ हजार टनपेक्षा जास्त कचरा कांजूर डम्पिंग येथे टाकण्यात येतो. त्यामुळे येथील कचºयाच्या ढिगाºयामुळे नागरिकांना त्रास भोगावा लागत आहे.>जगण्याच्या अधिकारावर गदाभारतीय संविधानानुसार प्रत्येक नागरिकास स्वच्छ हवेमध्ये जगण्याचा अधिकार आहे. त्या अधिकारानुसार येथील नागरिकांच्या जगण्याच्या अधिकारावर गदा येत आहे. त्यामुळे विभागातील नागरिकांच्या वतीने प्रशासनाला विनंती करण्यात येत आहे की, सदर ग्राउंडवर असलेल्या व्यवस्थापनेवर महापालिकेने लक्ष द्यावे. अन्यथा आंदोलन छेडले जाईल.- संजय गोपाळ येतवे,अध्यक्ष, विक्रोळी विकास मंच>तक्रार करायची कुठे?कांजूरमार्र्ग येथील डम्पिंग ग्राउंडमधून उग्र दर्प येतो. रहिवाशांना आजाराचे त्रास होत आहेत. दिवाळीत याचा जास्त त्रास झाला. महापालिकेच्या तक्रार क्रमांकांवर संपर्क केला असता उडवाउडवीची उत्तरे मिळतात. त्यामुळे तक्रार करायची कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रहिवाशांना श्वसनासह त्वचा आजाराचा त्रास होत आहे. कांजूर डम्पिंग ग्राउंडवर प्रक्रिया न करता कचरा टाकला जातो. त्यामुळे दुर्गंधी मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. प्रशासनाने काही तरी कार्यवाही करावी ही अपेक्षा आहे.- गणेश शेट्टी, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :dumpingकचरा