शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

महिलांसाठी दामिनी पथक

By admin | Updated: March 8, 2016 02:04 IST

गेल्या वर्षभरापासून रायगड जिल्ह्यात वाढीस लागलेल्या महिलांशी निगडित गुन्ह्यांना आळा घालण्याकरिता, जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी व आपत्कालीन मदतीसाठी ‘दामिनी

अलिबाग : गेल्या वर्षभरापासून रायगड जिल्ह्यात वाढीस लागलेल्या महिलांशी निगडित गुन्ह्यांना आळा घालण्याकरिता, जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी व आपत्कालीन मदतीसाठी ‘दामिनी’ पथकाची निर्मिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक यांनी केली आहे. मंगळवारी जागतिक महिला दिनी हे दामिनी पथक जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात येत असल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे. दामिनी पथकासाठी रायगड पोलीस दलात कार्यरत महिला पोलिसांपैकी २३ महिला पोलिसांची निवड करण्यात आली आहे. या दामिनी पथकातील २३ महिला पोलिसांचे, रायगड पोलीस मुख्यालयात २३ फेब्रुवारी ते ७ मार्च या १५ दिवसांच्या कालावधीत विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करुन त्यांना मोटारसायकल चालविण्याचे उत्तम प्रशिक्षण मोटार परिवहन विभागाने तर व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक, एटीएम फ्रॉड, महिलांसंबंधित सायबर गुन्हे तसेच संगणकीय प्रशिक्षण रायगड पोलीस दलाच्याच सायबर सेलने दिले आहे. महिलांविषयी गुन्ह्यांबाबत तसेच त्याचे निराकरण करण्याबाबत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्याख्याने व कौशल्य प्रशिक्षण दिले. दामिनी पथकाच्या महिलांना इंग्रजीचे विशेष प्रशिक्षण दिले आहे. ८ मार्चला रायगड पोलीस मुख्यालयात या पथकाच्या कामाचा शुभारंभ होणार आहे.