अकोला : गत आठवडाभरात दमदार पाऊस बरसल्याने, अमरावती विभागातील धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. रविवारी सायंकाळपर्यंत अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा धरण२४.९१ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा २३.७३ टक्के आणि यवतमाळ जिल्ह्यातील पूस धरणात ३६.९० टक्के जलसाठा उपलब्ध झाला.गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, पश्चिम विदर्भातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही. तसेच या वर्षीचा पावसाळा सुरू झाल्यानंतर दीड महिना पावसाने दांडी मारली. त्यामुळे अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत अत्यल्प जलसाठा उपलब्ध असतानाच, गत मंगळवार वबुधवारी विभागातील पाचही जिल्ह्यांत संततधार पाऊस झाला. दमदार पाऊस बरसल्याने जलसाठ्यात वाढ झाली. (प्रतिनिधी)
अमरावतीतील धरण जलसाठ्यांत वाढ
By admin | Updated: August 11, 2015 01:13 IST