ठाणो : येथील मोटर अपघात प्राधिकरणाने सागर सोनवणो (19) या मुलाच्या मृत्यु प्रकरणात सव्वा आठ लाखांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे. दिवाणी न्यायाधीश आणि प्राधिकरणाचे सदस्य एस. वाय. कुलकर्णी यांनी एका खासगी बसचे मालक जावेद खान, गोवा आणि युनिव्हर्सल सोम्पो वीमा कंपनी यांना संयुक्तपणो हे पैसे सात टक्के वार्षिक व्याजाच्या रक्कमेसह त्याच्या आईला देण्याचे आदेश दिले आहेत.
भिवंडी तालुक्यातील अकटोली, पडघा या गावातील सुनिता सोनवणो यांचा मुलगा सागर हा 1क् जून 2क्1क् मध्ये सिंधुदूर्ग येथून मुंबईला एका खासगी बसने येत होता. त्यावेळी त्याच्या बसने एका आंब्याच्या झाडाला धडक दिली. त्यामध्ये काही प्रवासी जखमी झाले होते. त्यात जखमी झालेल्या त्यांच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. पडघ्याच्या एका बिल्डींग मटेरियल सप्लायर्स अॅन्ड सिव्हील कॉन्ट्रॅक्टरकडे गवंडी म्हणून काम करणा:या आपल्या मुलाला 12 वेतन मिळत असल्याचा दावा सुनिता यांनी केला होता. भरघाव व निष्काळजीपणो बस चालविल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याद्वारे या महिलेने पाच लाखांच्या भरपाईचा दावा केला होता. आई ही मुलावर अवलंबून असल्यामुळे नुकसान म्हणून आठ लाख दहा हजार अधिकचा खर्च दहा हजार व पाच हजार अंत्यसंस्काराचा खर्च असे सव्वा 8 लाख देण्याचे आदेश प्राधिकरणाने दिले. यातील 2क्} रक्कम थेट सुनिता यांना तातडीने देण्यात यावी तर उर्वरित 8क्} रक्कम त्यांच्या नावाने बँकेत गुंतविण्यात यावी, असे आदेश प्राधिकरणाने दिले आहेत. (प्रतिनिधी)