पुणो : आजच्या काळातला दलित चळवळीतला संभ्रम पाहिला, तर नामदेव ढसाळ यांची उणीव जास्त भासते. दलित चळवळीने मोदींना पाठिंबा देणो हा कम्युनिस्टांचा पराभव आहे, असे स्पष्ट मत प्रसिद्ध हिंदी कवी विष्णू खरे यांनी मांडले.
‘मिळून सा:याजणी’ मासिकाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या सांगता कार्यक्रमात ते ‘पद्मश्री नामदेव ढसाळ-व्यक्ती आणि साहित्य’ या विषयावर बोलत होते. या वेळी मासिकाच्या संस्थापक विद्या बाळ आणि संपादक गीताली वि.मं., छाया दातार उपस्थित होत्या.
खरे म्हणाले, ढसाळ हे राजकारणी होते. त्यांच्या राजकीय भूमिकेवर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. पण, त्याचे मूळही त्यांच्या राजकारणी असण्यातच होते. आजच्या परिस्थितीत ते असायला हवे होते, असे प्रकर्षाने वाटते.
ढसाळ हे विश्वकवीच होते आणि त्यांच्या कवितेची आवश्यकता पुढील 5क् वषर्ं तरी भासत राहील, असे मत खरे यांनी मांडले. ते म्हणाले, त्यांच्या कवितांचा भारतीय भाषात आणि जर्मन, इटालियन भाषातही अनुवाद व्हायला हवा. तसा तो झाला असता तर त्यांना नोबेल पारितोषिक मिळू शकले असते. त्यांची योग्यताच तशी होती. या वेळी बोलताना विद्या बाळ यांनी मासिकाच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला. आजच्या परिस्थितीत वैचारिक पातळीवर चिंतेचे वातावरण आहे. असे सांगून त्या म्हणाल्या, परिवर्तनाची वाट अधिक कठीण होईल का, याची भीती आता वाटत आहे. छाया दातार यांच्या ‘स्त्रियांचे नाते-जमिनीशी आणि पाण्याशी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. (प्रतिनिधी)
4 प्रज्ञा पवार आणि सतीश काळसेकर यांनी नामदेव ढसाळ यांच्या काही कविता सादर क रून प्रेक्षकांची दाद मिळवली.