शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

दलित हत्याकांडाचे गूढ कायम

By admin | Updated: October 23, 2014 14:52 IST

तालुक्यातील जवखेडे खालसा येथील दलित कुटुंबातील तिघा जणांची क्रूरपणे हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यच हादरले आहे.

पाथर्डी (अहमदनगर) : तालुक्यातील जवखेडे खालसा येथील दलित कुटुंबातील तिघा जणांची क्रूरपणे हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यच हादरले आहे. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेच्या मुळाशी पोहचण्यात पोलीस अद्याप यशस्वी झालेले नाहीत. सोनई व खर्डा येथील दलित हत्येचे प्रकरण ताजे असतानाच जवखेडे खालसा येथील हत्याकांडाने सर्वांनाच धक्का बसला आहे. घटनेमागे एखादे नाजूक प्रकरण असावे, त्या दिशेने प्राथमिक तपास सुरू असला तरी अन्य कारणेही तपासली जात आहेत. मात्र, त्याबाबत पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दिवसभरात अनेक नेते व कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. गावात मोठा बंदोबस्त लावण्यात आल्याने परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे.गावामध्ये जाधव वस्तीवर संजय जाधव यांचे वडील रहातात. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले, माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे, खा. दिलीप गांधी, आमदार मोनिका राजळे यांच्यासह दलित चळवळीचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने येथे आले होते. नगर जिल्ह्यात सातत्याने दलितांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे नगर दलित अत्याचार ग्रस्त जिल्हा जाहीर करावा, अशी मागणी खा. आठवले यांनी केली. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा छडा लावून आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे हांडोरे म्हणाले. भाजपाच्या वतीने कुटुंबाला एक लाख रूपयांची मदत खा. गांधी यांनी जाहीर केली. नगर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत दलित हत्याकांडाच्या घटना वारंवार घडत आहेत. जवखेडे खालसा येथील हत्याकांडाने जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्थेसह सामाजिक सलोख्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संजय जगन्नाथ जाधव (४२), जयश्री संजय जाधव (३८) व सुनील संजय जाधव (१९) यांची धारदार शस्त्राने हत्या करून मृतदेहाचे तुकडे विहिरीत टाकल्याची भीषण घटना मंगळवारी उघडकीस आली होती. जाधव कुटुंब सुस्वभावी होते. त्यांचा कोणाशीही वाद नव्हता. (प्रतिनिधी)