कामशेत (पुणे) : मावळ तालुक्याच्या कोथुर्णे येथे निवडणुकीच्या वादातून जमावाने एका दलित कुटुंबावर हल्ला केला. महिला, मुलांना मारहाण करून दागिने लुटण्यात आले. या प्रकरणी २७ जणांवर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महिंद्र सोनवणे (४६) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतील जुन्या वादातून शुक्रवारी संध्याकाळी सचिन दत्तू दळवी याने सोनावणे यांना मारहाण केली. याबाबत ते पोलिसांत तक्रार देण्यास गेले असता दळवी यांनी आणखी काही लोकांसमवेत दलित वस्तीत जाऊन सोनवणे यांच्या घरावर हल्ला करत महिला, मुलांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी २७ जणांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
पुण्याजवळ दलित कुटुंबावर हल्ला
By admin | Updated: October 25, 2015 01:35 IST