शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

डहाण-बोर्डी मार्ग बनला धोकादायक

By admin | Updated: July 4, 2016 03:52 IST

डहाणू तालुक्याला पावसाचा तडाखा बसला असून बराचसा भाग पाण्याने व्यापला आहे.

डहाणू/बार्डी : डहाणू तालुक्याला पावसाचा तडाखा बसला असून बराचसा भाग पाण्याने व्यापला आहे. मागील तीन दिवसांपासून पावसाचा जोर अधिक असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावरून पुराचे पाणी वाहत होते. दरम्यान डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गावरील नरपड गावातील कुंभारखाडीनजीकचा रस्ता शनिवारी संध्याकाळी खचल्याने यामार्गावरील वाहतूक धीम्यागतीने सुरू होती. डहाणू सार्वजनिक बांधकाम विगभागाच्या दुर्लक्षतेमुळे मार्ग धोकादायक बनल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. आजतागायत डहाणू तालुक्यात या मोसमतील पावसाने हजार मिमी टप्पा गाठला आहे. काही दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचले, तर काही ठिकाणी रस्त्यावरून पुराचे पाणी वाहत आहे. डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गाचे पावसामुळे ठिकठिकाणी नुकसान झाले आहे. नरपड गावतील साई बाबा मंदिराजवळील कुंभारखाडी येथे दोन दिवसांपासून रस्त्यावरून पुराचे पाणी वाहत होते. शिवाय काल संध्याकाळी या फरशीच्या डहाणूकडील भागाचा डांबरी रस्ता खचल्याची घटना घडली. दरम्यान स्थानिकांनी मदत कार्य सुरू करून, धोक्याची सूचना देणारा झेंडा आणि अवजड वस्तु रस्त्याच्या मध्यभागी ठेवल्याने वाहतूक धीम्यागतीने सुरू आहे. चिखले गावातील वडकतीपाड्याच्या बर्वेवाडी येथील वळणावर मोरीला मोठाले भगदाड पडले आहे. त्यामुळे डहाणू बोर्डी हा प्रमुख मार्ग प्रवाशांसाठी जीवघेणा ठरला आहे. ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याने जीव गमवण्याची वेळ येवून ठेपल्याने स्थानीकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या बाबत डहाणू सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरक्षेच्यादृष्टीने तत्काळ पाऊल उचलण्याची मागणी जोरधरू लागली आहे. (वार्ताहर)