शशिकांत ठाकूर,कासा- डहाणू तालुक्यातील चारोटी-डहाणू रस्त्यावरील पुलांची बिकट अवस्था झाली आहे. काही जुनाट पूल धोकादायक झाले आहेत. या पुलांवर अनेक वेळा लहान मोठे अपघात पुलांचे संरक्षक कठडे तुटल्याने होतात. आशागड, गंजाड, बधना या तिन्ही नदीवरील पुलांची दुरावस्था झाली आहे. महाडच्या सावित्री नदी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ही दुरावस्था गंभीर मानली जात आहे. हा संपूर्ण मार्ग २४ किमीचा असून मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला आणि तालुक्याच्या ठिकाणाला जोडणारा मुख्य रस्ता आहे. रस्तयावर आशागड, गंजाड, बधना, असे मीन मोठ्या नदीवरील पूल आहेत. काही दिवसापूर्वी या रस्त्यावरील सुसरी नदीवर असलेल्या बधना पुलाला कठडे नसल्याने एक कार नदीत पडली होती. हा पूल वळणाचा असून गेल्या पाच वर्षांपासून नादुरुस्त आहे.>पिलर झाले कमजोरया रस्त्यावरील तीनही पूल धोकादायक असून येथे कोणत्याही प्रकारचे सूचना फलक लावण्यात आले नाहीत. बधनापूलाच्या खालचा स्लॅब जीर्ण झाला असून आतमधील लोखंडी सळया पूर्णपणे दिसू लागल्या आहेत. तसेच त्याचे पिलरही कमजोर झाले आहेत. पुलाचे तत्काळ स्ट्रक्चरल आॅडिट करून सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती करण्याची गरज आहे.महाड तालुक्यातील सावित्री नदीची घटना अलिकडचीच असल्याने त्याची पुनरावृत्ती डहाणूत न व्हावी अशी मागणी होत आहे. आशागड, गंजाड, बधना या नद्यावरील पुलांची दुरावस्था पहाता स्ट्रक्चरल आॅडिट होणे गरजेचे आहे.
डहाणू रस्त्यावरील पूल धोकादायक
By admin | Updated: March 7, 2017 03:03 IST