शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

By admin | Updated: January 10, 2015 01:13 IST

भरधाव वाहनाच्या धडकेत गर्भवती मादी बिबट ठार झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास ज्ञानगंगा अभयारण्यातील नांद्री शिवारात घडली.

खामगाव (जि. बुलडाणा) : भरधाव वाहनाच्या धडकेत गर्भवती मादी बिबट ठार झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास ज्ञानगंगा अभयारण्यातील नांद्री शिवारात घडली. ज्ञानगंगा अभयारण्यात बिबट अपघातात ठार झाल्याची वर्षभरातील ही दुसरी घटना असल्याने वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.बुलडाणा जिल्ह्णातील खामगाव, मोताळा आणि चिखली परिसरात २०५.२२ चौरस किलोमीटर क्षेत्रात ज्ञानगंगा अभयारण्य वसले आहे. या अभयारण्यातून खामगाव-बोथा (फॉरेस्ट) मार्गे बुलडाणा हा राज्य मार्ग आहे. शुक्रवारी पहाटे ४च्या सुमारास सर्पमित्र एम.बी. रसाळ हे या मार्गाने जात असताना त्यांना नांद्रीनजीक बिबट मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी याबाबतची माहिती वन अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. डोक्याला, तोंडाला व मागील पायाला मार लागल्याने बिबटचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. शवविच्छेदन केले असता बिबट गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. बिबटच्या गर्भातील ३ बछड्यांचाही मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर बिबटवर अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)च्खामगाव-बुलडाणा या मार्गावर अहोरात्र वर्दळ असते. ज्ञानगंगा अभयारण्यातील प्राणी रात्रीच्या वेळी भटकंती करत असताना या मार्गावरील वाहनांच्या धडकेचे शिकार बनत आहेत. गतवर्षी १ जानेवारी २०१४ रोजी बोथा घाटात रात्रीच्या वेळी मादी बिबटचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. त्या बिबटच्या पोटातही २ बछडे असल्याचे शवविच्छेदनात निष्पन्न झाले होते. गतवर्षभरात दोन मादी बिबट व गर्भातील पाच बछड्यांना भरधाव वाहनांमुळे प्राण गमवावे लागले आहेत. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणाऱ्या मार्गावर प्रत्येक १ किलोमीटर अंतरावर गतिरोधक बसविण्यासाठी खामगाव व बुलडाणा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले आहेत; मात्र केवळ २ ठिकाणीच गतिरोधक करण्यात आले आहेत.- जी.व्ही. भगत, वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) कार्यालय खामगाव.