शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराकडून दगाफटका; प्रेयसीची जाळून घेवून आत्महत्या

By admin | Updated: April 11, 2017 18:46 IST

लग्नाचे आमिष दाखवून अनैतिक संबंध ठेवले़ नंतर मात्र लग्नास नकार देवून दुसऱ्या मुलीसोबत प्रियकर लग्न करीत असल्याचे समजल्याने प्रेयसीने पेटवून घेवून

ऑनलाइन लोकमत

मुखेड / जांब (जि. नांदेड), दि. 11: लग्नाचे आमिष दाखवून अनैतिक संबंध ठेवले़ नंतर मात्र लग्नास नकार देवून दुसऱ्या मुलीसोबत प्रियकर लग्न करीत असल्याचे समजल्याने प्रेयसीने पेटवून घेवून आत्महत्या केल्याची घटना ९ एप्रिल रोजी जांब बु़ (ता़ मुखेड) येथे घडली़ याप्रकरणी पोलिसांनी प्रियकराविरूद्ध गुन्हा नोंदविला़जांब बु़ येथील मयत तबसुम नवाज शेख हिचा विवाह नायगाव तालुक्यातील कहाळा येथील शब्बीर पटेल शेख यांच्याशी झाला़ विवाहानंतर तिला दोन अपत्य झाली़ मात्र सासरी पटत नसल्याने तबसुम माहेरी जांब बु़ येथे वडिलांच्या घरी राहण्यास आली़ दरम्यान, तिचे मगदुम गोरे मियॉसाब शेख याच्याशी सुत जुळले़ मगदुमने तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले़ दुसरीकडे मगदुमच्या विवाहाची तयारी त्याच्या घरच्यांनी सुरू केली़ ही बाब तबसुम हिच्या लक्षात येताच तिने लग्नासाठी मगदुमकडे आग्रह धरला़ मात्र त्याने टाळाटाळ केली़ मगदुमचा विवाह चाकूर येथील मुलीशी जमवून ९ एप्रिल रोजी सकाळी जांब बु़ येथे धुमधडाक्यात पार पडत असतानाच तबसुम तेथे पोहोचली़ तिने लग्नास विरोध केला़ मागील हकीकत सर्वांसमोर मांडली़ काहींनी तिची समजूत घालून तिला वडिलांच्या घरी नेवून सोडले़ तथापि ही बाब सहन न झाल्यामुळे तबसुमने घराची कोंडी आतून लावून रॉकेल अंगावर टाकून स्वत:ला पेटवूून घेतले़ यात ती ९० टक्के भाजली़ तिला नांदेड येथे उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला़ तबसुमचा भाऊ मोहसीन नवाज शेख याने मुखेड पोलिस ठाणे गाठून बहिणीच्या मृत्यू प्रकरणी मगदुम गोरे विरूद्ध तक्रार नोंदविली़ पोलिसांनी गुन्हा नोंदवून मगदुमला अटक केली़ सपोनि व्ही़ एम़ कांबळे तपास करीत आहेत़ नवरदेवाला लग्नाच्या बेडीऐवजी पोलिसांच्या बेड्या हातात घालाव्या लागल्या़ (वार्ताहर)