शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

दारुड्याचा पत्नी, मुलावर अ‍ॅसिड हल्ला

By admin | Updated: August 24, 2015 00:47 IST

दारुड्याने किरकोळ वादातून पत्नी व मुलाच्या अंगावर अ‍ॅसिड फेकून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी रात्री शहरातील गोविंदनगर भागात

नांदेड : दारुड्याने किरकोळ वादातून पत्नी व मुलाच्या अंगावर अ‍ॅसिड फेकून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी रात्री शहरातील गोविंदनगर भागात घडली़ पोलिसांनी आरोपीला अटक केली असून महिला आणि मुलावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ गोविंदनगर भागात मधुकर शहाणे (४०) हा पत्नी ज्योती (३२) आणि मुलगा अनिकेत (१०) यांच्यासोबत राहतो़ मधुकर सराफा दुकानात कारागीर म्हणून काम करतो़ दारूच्या व्यसनामुळे त्याने अनेकांकडून कर्जही घेतले होते़ वेळेवर कर्ज फेडू न शकल्याने अनेकांनी घरी येऊन त्याची पत्नी ज्योती यांना ही बाब सांगितली़ याबाबत ज्योती यांनी विचारणा केली असता मधुकर वारंवार मारहाण करू लागला़ दरम्यान, शनिवारी रात्री मधुकर पुन्हा दारुच्या नशेत तर्र होऊन घरी आला आणि काही कळण्याच्या आत त्याने सोबत आणलेल्या देशी दारुच्या बाटलीतील अ‍ॅसिड पत्नी आणि मुलाच्या अंगावर फेकले़ त्यानंतर दरवाजाची कडी बाहेरुन लावून पळ काढला़ ज्योती व अनिकेतने आरडाओरड करण्यास सुरुवात केली़ शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले़ याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़