शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

दादा कोंडके यांच्या संपत्तीचा वाद हायकोर्टात

By admin | Updated: April 10, 2016 03:12 IST

दिवंगत मराठी अभिनेते व निर्माते दादा कोंडके यांच्या मृत्यूनंतर १८ वर्षांनंतरही त्यांच्या संपत्तीचा वाद मिटलेला नाही. दादा कोंडके यांची मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या तेजस्विनी विजय शिवा

- दीप्ती देशमुख,  मुंबईदिवंगत मराठी अभिनेते व निर्माते दादा कोंडके यांच्या मृत्यूनंतर १८ वर्षांनंतरही त्यांच्या संपत्तीचा वाद मिटलेला नाही. दादा कोंडके यांची मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या तेजस्विनी विजय शिवा यांना पुणे दिवाणी न्यायालयाने दिलेल्या वारसापत्राच्या निर्णयाविरुद्ध ‘शाहीर दादा कोंडके प्रतिष्ठान’ने उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे.दादा कोंडके यांनी २ जानेवारी १९९८ रोजी इच्छापत्र तयार केले. इच्छापत्राचे कार्यवाह म्हणून ‘शाहीर दादा कोंडके प्रतिष्ठान’ची स्थापनाही त्यांनी केली. मात्र दादा कोंडके यांची संपत्ती मिळावी यासाठी तेजस्विनी विजय शिवा यांनी वारसपत्र मिळवण्यासाठी पुणे दिवाणी न्यायालयात अर्ज केला. पुणे दिवाणी न्यायालयाने त्यांना वारसपत्र दिले. त्यास ‘प्रतिष्ठान’चे विश्वस्त व ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण, अफ्रिन चौगुले, हृदयनाथ दत्तात्रय कडू-देशमुख, ललिता वाकणकर, सायली वराडकर, संग्राम शिर्के व रोहित कडू-देशमुख यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. अपीलानुसार, तेजस्विनी यांना वारसपत्र देताना दिवाणी न्यायालयाने प्रतिष्ठानची बाजू ऐकलीच नाही. वारस जाहीर करण्यापूर्वी न्यायालयाने नोटीस बजावून मृत व्यक्तीचे अन्य कोणी वारसदार आहे की नाही, याची खातरजमा करून घेणे आवश्यक होते. मात्र न्यायालयाने ही कायदेशीर प्रक्रिया डावलली. संपत्तीच्या व्यवस्थापनाच्या मुद्द्यावरून तेजस्विनी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याच अर्जावरील सुनावणीत उच्च न्यायालयाने ५ जून २००८ रोजी दादा कोंडके आणि तेजस्विनी यांच्या नात्यावरूनच वाद असल्याने संपत्तीचे व्यवस्थापन करण्याच्या अर्जावर सुनावणी घेताना तेजस्विनी यांच्या दाव्यात किती तथ्य आहे, हे तपासून घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र तेजस्विनी यांना वारसपत्र देताना दिवाणी न्यायालयाने याकडेही दुर्लक्ष केले, असेही संस्थेने दाव्यात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)