शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दाभोलकर, पानसरे हत्या; तपास अहवाल सादर

By admin | Updated: April 22, 2017 01:37 IST

डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी शुक्रवारी सीबीआय व सीआयडीने उच्च न्यायालयात तपास अहवाल सादर केले. या तपास अहवालावरून सीबीआयला

मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी शुक्रवारी सीबीआय व सीआयडीने उच्च न्यायालयात तपास अहवाल सादर केले. या तपास अहवालावरून सीबीआयला अनेक बाबींसाठी परवानगी घ्यावी लागणार असल्याचे म्हणत, उच्च न्यायालयाने या सर्व बाबी कधीपर्यंत स्पष्ट करण्यात येतील? अशी विचारणा सीबीआयकडे केली. सीबीआय सीआयडीला मदत करेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असे न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. साधना जाधव यांनी अहवाल वाचल्यानंतर म्हटले. दाभोलकर व पानसरे यांच्या हत्येप्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चालावा, यासाठी सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर व दाभोलकर, पानसरेंच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शुक्रवारच्या सुनावणीत आरोपींच्या वकिलांनी कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. शिवाजी राणे यांच्या नियुक्तीस विरोध केला आहे. आरोपींच्या म्हणण्यानुसार, राणे यांना राज्य सरकारने ‘विशेष सरकारी वकील’ म्हणून नियुक्त केले नाही. त्यांना कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांनी नियुक्त केले आहे. अधीक्षकांना विशेष सरकारी अधिकारी नियुक्त करण्याचा अधिकार नाही. त्याशिवाय राणे विशेष सरकारी वकिलांच्या पॅनेलवरही नाहीत, त्यामुळे त्यांना हा खटला चालवायला देऊ नये. या किरकोळ कारणावरून खटल्यास विलंब होऊ देऊ नका. राज्य सरकारने याचा निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही निर्णय घेऊ, असे स्पष्ट करत खंडपीठाने या याचिकांवरील पुढील सुनावणी २२ जून रोजी ठेवली आहे. (प्रतिनिधी)