शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

डब्बा किंग दिनेश भुतडा अखेर गजाआड

By admin | Updated: September 22, 2016 01:45 IST

बाळापूर पोलिसांनी बुधवारी केली अटक ; २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी.

अकोला, दि. २१ - आकोटातील लोहारी रोडवरच्या आलिशान बंगल्यामधून ह्यकस्तुरी कमोडिटीजह्णच्या नावाखाली चालविण्यात येत असलेल्या समांतर शेअर मार्केट (डब्बा ट्रेडिंग)चा सुत्रधार दिनेश लक्ष्मीनारायण भुतडा यास बाळापूर पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्यानंतर आरोपीस आकोट येथील विशेष न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपी दिनेश भुतडास २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.जिल्हा पोलीस पोलीस अधीक्षक चंद्रकीशोर मीना यांच्या विशेष पथकाने १ जुन रोजी आकोट येथे छापा घालुन संगणक, लॅपटॉप, मोबाइल, गुन्हयाशी संबंधित महत्त्वाचे दस्तावेज आणि अनधिकृतरीत्या चालविण्यात येत असलेल्या डब्बा ट्रेडिंगचे ह्यसौदाह्ण नावाचे सॉफ्टवेअर जप्त केले होते. येथून सात आरोपींना अटक करण्यात आली असून, नरेश व दिनेश भुतडा हे दोघे फरार झाले होते. पोलीस अधीक्षक मीणा यांनी कस्तुरी कमोडिटीजमधील डब्बा ट्रेडिंगच्या हालचालींवर पाळत ठेउन कारवाई करण्यात आली होती. या ठिकाणावरून ह्यसौदाह्ण नावाच्या अनधिकृत सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कोट्यवधीचा काळा पैसा गुंतविण्यात येत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलीस अधीक्षक मीणा यांच्या विशेष पथकाने दीपक महादेव राऊत, प्रशांत लाडोळे, संतोष भारसाकळे, रवींद्र भेंडारकर, गजानन मुराळे, राष्ट्रपाल भिसे, राजेश चंदन, संदीप वर्मा, उमाकांत मिश्रा या आरोपींना अटक केली होती तर दिनेश भुतडा फरार झाला होता. त्यानंतर दिनेश भुतडा याने अटकपुर्व जामीन मिळविण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने भुतडा याला दिलासा न देता पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश दिले. मात्र त्यानंतर दिनेश भुतडा याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. नागपूर खंडपीठाने जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत दिनेश भुतडा याने २0 सप्टेंबरपर्यंत पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश दिले. त्यानंतर भुतडाने अटकेपासून बचाव करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मात्र या प्रकरणाचे तपास अधिकारी सुशील नायक यांनी आरोपी दिनेश भुतडा यास बुधवारी अटक केली. त्यानंतर आकोट येथील विशेष न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस २६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दिनेश भुतडास अटक झाल्याने या प्रकरणातील कोट्टयवधी रुपयांचे अवैध व्यवहार आता उघड होण्याची शक्यता आहे.