शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

एसटीत पाणी विक्रेत्याची ‘दबंगगिरी’

By admin | Updated: June 27, 2016 23:12 IST

एस. टी. मध्ये खाद्यपदार्थ, पाणी बाटल्या आदींची विक्री करण्यास एस. टी. महामंडळाने निर्बंध लादले आहेत. परिणामी विके्र ते आणि चालक-वाहकांमध्ये दररोज खटके उडत

बसस्थानकात वाहकास धक्काबुक्की : दररोज वादाच्या घटनाऔरंगाबाद : एस. टी. मध्ये खाद्यपदार्थ, पाणी बाटल्या आदींची विक्री करण्यास एस. टी. महामंडळाने निर्बंध लादले आहेत. परिणामी विके्र ते आणि चालक-वाहकांमध्ये दररोज खटके उडत आहेत. अशा परिस्थितीत मध्यवर्ती बसस्थानकात रविवारी एका पाणी विक्रेत्याने ह्यदबंगगिरीह्ण करून वाहकाला धक्काबुक्की केली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.बसस्थानकामधील विक्रेत्यांसाठी एस. टी.चे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. केवळ बसस्थानक परिसरातच खाद्यपदार्थांची विक्री करण्याची मुभा विक्रेत्यांना देण्यात आली आहे; परंतु तरीही बसस्थानकात एखादी बस प्रवेश करीत नाही, तोच त्यामध्ये प्रवेश करण्याची विक्रेत्यांमध्ये चढाओढ दिसून येते. अधिक नफा मिळविण्याच्या प्रयत्नात विक्रेत्यांकडून सर्रास थेट बसगाड्यांमध्ये जाऊन विक्री केली जात आहे. यातून अनेकदा प्रवाशांना धक्काबुक्कीचे प्रकार होतात. बसमध्ये विक्रेत्यांना विक्री करण्यापासून रोखावे, यासंदर्भात चालक-वाहकांना सूचना करण्यात आली आहे; परंतु विक्रेते अरेरावीची भाषा करून चालक-वाहकांबरोबर वाद घालतात. मध्यवर्ती बसस्थानकात रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास औरंगाबाद- नाशिक बसमध्ये पाणी विक्र ी करणाऱ्या विक्रेत्यास वाहकाने खाली उतरण्यास सांगितले. त्यावेळी विक्रेत्याने असभ्य भाषेत बोलत थेट वाहकावर हात उचलला. यावेळी विक्रेत्याने वाहकास धक्काबुक्की केली. हा प्रकार समजताच अन्य कर्मचाऱ्यांनी विक्रेत्यास बसस्थानकातील पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले. अशा परिस्थितीमुळे पूर्वीप्रमाणे प्रवासी मित्र पथकाची स्थापना करण्याची मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे.