शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पेणमध्ये सायलेन्सरचा आवाज वाढला

By admin | Updated: June 30, 2016 03:04 IST

वाहनांच्या सायलेन्सरच्या आवाजाची पातळी व त्यातून होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा मापदंड पाहिल्यास कंप सुटल्यागत परिस्थितीचा अनुभव येतो.

पेण : सध्या राज्यभरात वाहनांची प्रचंड संख्या वाढली आहे. या वाहनांच्या सायलेन्सरच्या आवाजाची पातळी व त्यातून होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा मापदंड पाहिल्यास कंप सुटल्यागत परिस्थितीचा अनुभव येतो. सायलेन्सरमधून येणाऱ्या आवाजाची क्रेझ सध्या यंग जनरेशनचा नवा फंडा बनला आहे. मात्र आवाजाची पातळी व ध्वनिप्रदूषणाची डेसिबल मर्यादा ओलांडणाऱ्या या बाइकस्वाराकडे आरटीओ व वाहतूक पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष घालून सायलेन्सरचा आवाज खाली करण्याची कारवाई करावी असे पेणच्या अनेक ज्येष्ठ नागरिकांचे यासंदर्भातील म्हणणे लोकमतशी बोलताना व्यक्त के ले.सायलेन्सरमधील इंजिनचा आवाज कमी करण्यासाठी बसवण्यात येणाऱ्या इंजिनमध्ये नियमबाह्य बदल करून आवाज वाढविण्याकडे वाहनचालकांचा भर आहे. यामध्ये तरुणाईच्या डोक्यात हे आवाजाचे फॅड आहे. बाइकस्वारी करताना हा आवाज कुणाचा ओळख व्हावी यासाठी भलतेच वेड पांघरलेले हे बाइकस्वार आपल्या सायलेन्सरमधून निघणारा आवाजाचा त्रास इतरांना होईल याचे भान त्यांना राहत नाही. आपल्या बाइकस्वाराकडे इतरांचे लक्ष वेधून घेण्याच्या हट्टापायी त्या वाहनातून उद्भवणाऱ्या ध्वनिप्रदूषणाची मर्यादा २०० ते २३० डेसिबलच्या वर जाणारी आहे असे प्रदूषणाचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञ मंडळीचे आहे. सध्या शैक्षणिक वर्षाचा हंगाम सुरू झाल्याने शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात अथवा शहराच्या मुख्य रस्त्यावर या आवाजी बाइकस्वाराचे दर्शन नित्यनेमाने घडत असते. तारुण्याचा आनंद उपभोगताना स्वत: आनंदाने जगा व दुसऱ्यांना ही तशाच प्रकारे जगू द्या हा सध्या पर्यावरण संवर्धनाचा गोड विषय असताना, रस्त्यावरून जाणाऱ्यांना या आवाजाचा त्रास होतो याचे भान यांना कदाचित नसावे. नियम व शासकीय यंत्रणांनी केलेले कायद्यांचे उल्लंघन करू नका. आवाजाची पातळी वाढविणारे सायलेन्सरवर खर्च करण्याची फॅशन सध्या करू होवू घातली. सायलेन्सवर खर्च करण्याची फॅशन सध्या रुढ होवू घातलीय. या महानगरातील फॅड सध्या शहरी व ग्रामीण संस्कृतीत अवतरत असतानाच हा आवाज कुणाचा! ही प्रतिष्ठा जपण्यापेक्षा सुरक्षित प्रवास, कायद्याचा बंधनातील प्रवास ही वाहतूक प्रणाली लक्षात ठेवून संबंधित शासकीय यंत्रणांनी हा आवाज खाली कसा येईल, याबाबत संबंधितांना समज द्यावी, न ऐकल्यास नियमांच्या निकषानुसार कारवाई करावी, असे ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे.