शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

चेंबूरमध्ये सिलिंडरचा स्फोट

By admin | Updated: August 26, 2014 04:33 IST

घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी चेंबूरच्या पी. एल. लोखंडे मार्गावर घडली.

मुंबई : घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी चेंबूरच्या पी. एल. लोखंडे मार्गावर घडली. या घटनेत १५ जण जखमी असून, त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महेश जगताप (३८) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव असून, तो येथील सहदीप कॉलनीतील जगताप चाळीत आई, पत्नी व दोन मुलींसह राहत होता. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवण आटोपल्यानंतर सर्वजण झोपले होते. मात्र घरातील गॅस सिलिंडर लिकेज असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात गॅसगळती होत होती. रात्रीच या कुटुंबीयांना गॅसचा वास येत होता, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे रात्रभर हा गॅस संपूर्ण घरामध्ये पसरला. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास महेश यांची पत्नी जोत्स्ना जगताप (२५) नेहमीप्रमाणे झोपेतून उठली. तिने लाइट लावण्यासाठी बटण चालू केले. याच दरम्यान घरात पसरलेल्या गॅसने पेट घेतला आणि काही क्षणांतच सिलिंडरचा देखील मोठा स्फोट झाला. गॅसचा हा स्फोट एवढा भयानक होता, की त्यामुळे घरावर असलेला पोटमाळा खाली कोसळला. शिवाय आजूबाजूच्या तीन घरांच्या भिंतीदेखील झोपेत असलेल्या कुटुंबीयांवर कोसळल्या. त्यात एकाचा मृत्यू तर १५ जखमी झाले.