शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडर स्फोट : कर्जाच्या रकमेसह हिरव्या स्वप्नांची राखरांगोळी

By admin | Updated: April 23, 2016 05:00 IST

दुष्काळाशी लढतांना शेतीसाठी बॅँकेतून कर्जाची रक्कम काढून घरी आणावी आणि सिलिंडरचा स्फोटात या रकमेसह संसारपयोगी वस्तूच्या क्षणार्धात चिंधड्या उडाव्यात.

अवर्षणग्रस्त शेतकऱ्यावर आभाळ कोसळले शैलेश कर्पे. सिन्नर (जि.नाशिक)दुष्काळाशी लढतांना शेतीसाठी बॅँकेतून कर्जाची रक्कम काढून घरी आणावी आणि सिलिंडरचा स्फोटात या रकमेसह संसारपयोगी वस्तूच्या क्षणार्धात चिंधड्या उडाव्यात...यापेक्षा आभाळ ते काय कोसळणार? सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी घर, अन्न-धान्य आणि संसारपयोगी वस्तूंची राखरांगोळी डोळ्याने पाहण्याचा दुर्देवी प्रसंग सिन्नर तालुक्यातल्या अवर्षणग्रस्त शेतकऱ्याच्या नशिबी आला आहे. कर्जाचा आधारही नियतीने हिरावून नेल्याने हिरवे स्वप्नही कोमोजून गेले. खडांगळी येथील रामनाथ त्र्यंबक कोकाटे या शेतकऱ्याच्या घरी शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. कोकाटे कुटुंबिय बाहेरगावी होते. त्यामुळे जीवितहानी टळली. घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सिलिंडरच्या स्फोटाने क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. निमगाव-देवपूर शिवारात कोकाटे यांची वस्ती आहे. पाण्याची परिस्थिती जेमतेम. अशा परिस्थितीत कोकाटे यांची शेती जगविण्यासाठी धडपड सुरु आहे. कोकाटे यांनी गुळवंच येथील आयडीबीआय बॅँकेतून कर्जाची रक्कम काढून घरातील कपाटात ठेवली होती.शुक्रवारी सकाळी कोकाटे कुटुंबीय पुतणीच्या मुळाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी सिलिंडरचा स्फोट झाला आणि घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सिलिंडरचे तुकडे सुमारे शंभर फूटावर जावून पडले.कोकाटे यांनी कपाटात १ लाख २० हजारांची रक्कम ठेवली होती. स्फोटात कपाटाच्याही चिंधड्या उडाल्या. त्यातील १ लाख २० हजाराची रक्कमही जळून खाक झाली. पंचनाम्यात सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. चौकट-शिलाई मशिनही नेस्तनाबूतकोकाटे यांची पत्नी उर्मिला या शिवणकाम करतात. स्फोटात दोन शिलाई मशीन्स व पीको फॉलचे मशिनही नेस्तनाबूत झाले. स्फोटाने उपजीविकेचेही साधन गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. कोकाटे यांचा मुलगा रोहित आभियांत्रिकीचे शिक्षण घेतो. त्याची महत्त्वाची कागदपत्रेही जळून खाक झाली. कोकाटे यांच्याकडे केवळ अंगावरचे कपडे सोडून अन्य कोणतेही संसारपयोगी साहित्य उरले नाही.