शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

बारावी पेपर फुटीचा तपास सायबर सेलकडे

By admin | Updated: March 4, 2017 05:52 IST

बारावीचा मराठी पेपर फुटला नसल्याचा दावा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केला आहे.

पुणे/मुंबई : इयत्ता बारावीचा मराठी पेपर फुटला नसल्याचा दावा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केला आहे. मात्र, व्हॉट्सअ‍ॅपवर पेपर व्हायरल झाल्याप्रकरणी मंडळाच्या मुंबई विभागामार्फत सायबर सेलकडे तक्रार देण्यात आली आहे. पोलीस तपासणी पूर्ण झाल्यानंतर पेपरबाबत निर्णय घेतला जाईल, असे मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सांगितले. बारावीची मराठी विषयाची परीक्षा सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर प्रश्नपत्रिका मिळाल्याने खळबळ उडाली होती. ही प्रश्नपत्रिका गुरूवारी १०.४५ वाजता अनेक विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर आली. त्यामुळे मराठीचा पेपर फुटल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, राज्य मंडळाने पेपर फुटला नसल्याचा दावा केला आहे. याविषयी माहिती देताना मंडळाचे अध्यक्ष म्हमाणे म्हणाले, ‘‘मराठीचा पेपर फुटलेला नाही. व्हॉट्सअ‍ॅपवर पेपर व्हायरल झाल्याप्रकरणी मुंबई विभागाने सायबर सेलकडे तक्रार दिली आहे. हा पेपर व्हायरल कसा झाला, त्यामध्ये कोणाचा हात आहे, ही माहिती तपासात पुढे येईल. तपासणी अहवाल आल्यानंतर पेपरबाबत निर्णय घेण्यात येईल.’’ वॉट्स अपवर पेपर व्हायरल झाल्याचे प्रकार ज्या विभागात घडले, त्या संबंधित विभागीय मंडळाकडून सविस्तर अहवाल मागविण्यात आला आहे. कॉपी पुरविणाऱ्यास एक हजार दंडपाथर्डी (जि. नगर): बारावी परीक्षेत मराठीचा विषयाच्या पेपरला आदर्श माध्यमिक विद्यालयात कॉपी पुरवणाऱ्या संदिप अशोक नितनाथ यास न्यायालयाने एक हजार दंड व कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावली. गुरुवारी परीक्षा केंद्रात कॉपी देताना नितनाथ यास पोलिसांनी रंगेहात पकडले होते. शुक्रवारी त्यास न्यायालयात हजर करण्यात आले़ आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर न्यायालयाने एक हजार रुपये दंड व कोर्ट उठेपर्यंत बसून राहण्याची शिक्षा दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)>वाशी पोलिसांत तक्रार मराठीचा पेपर व्हॉट्सअ‍ॅपवर फुटल्याप्रकरणी शुक्रवारी मुंबई विभागीय बोर्डाच्या वतीने वाशी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. सायबर सेलच्या मदतीने या घटनेबाबत तपास केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक, मुंबई विभागीय बोर्डाचे सहसचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी स्वत: पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.