शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये उद्योगांच्या पाण्यात कपात

By admin | Updated: April 13, 2016 02:03 IST

बीअर व मद्यनिर्मिती करणाऱ्या उद्योगांवर भर दुष्काळात २४ तास पाण्याची खैरात करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास (एमआयडीसी) अखेर उपरती झाली आहे.

औरंगाबाद : बीअर व मद्यनिर्मिती करणाऱ्या उद्योगांवर भर दुष्काळात २४ तास पाण्याची खैरात करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास (एमआयडीसी) अखेर उपरती झाली आहे. या उद्योगांना २४ तास मिळणाऱ्या शुद्ध पाण्यात अखेर कपात करण्यात आली असून, आता औद्योगिक वसाहतींना केवळ ३ ते १४ तास पाणीपुरवठा केला जाणार आहे. ही अघोषित पाणी कपात १५ एप्रिलपासून अंमलात आणली जाणार आहे. दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्यातील जनता पाण्यासाठी वणवण भटकत असताना औरंगाबादेतील बीअर व मद्यनिर्मिती उद्योगांना १६ रुपयांत एक हजार लिटर या दराने शुद्ध पाण्याचा २४ तास पुरवठा केला जात होता. मद्यनिर्मिती करणारे १२ उद्योग दररोज ४० लाख लिटर पाण्याचा वापर करीत होते.‘लोकमत’ने याबाबत आवाज उठविला. त्यानंतर आ. अब्दुल सत्तार यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर उद्योगांची पाणी कपात अटळ मानली जात होती; परंतु पाणी कपातीवर ठोस निर्णय घेण्याऐवजी अप्रत्यक्षपणे ती लागू करण्यात आली आहे. औद्योगिक क्षेत्राला २४ तास होणारा शुद्ध पाण्याच्या पुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय ‘एमआयडीसी’ने घेतला आहे. जायकवाडी धरणात सध्या जिवंत पाणीसाठा उपलब्ध नसल्याने मृत साठ्यातून औद्योगिक वसाहतींना पाणी पुरवठा केला जात आहे. मृत साठादेखील दररोज घटत आहे. औद्योगिक वसाहतींसाठी ब्रह्मगव्हाण येथील केंद्रातून पाण्याचा उपसा केला जातो. त्या ठिकाणीदेखील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांच्या ७ एप्रिलला झालेल्या संयुक्त बैठकीत जायकवाडीतील पाण्याचे नियोजन करून काटकसरीने वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार हे नियोजन करण्यात आले आहे. ब्रह्मगव्हाण येथील योजनेतून पाणी उचलण्यासाठी द्विस्तरीय पम्पिंग योजना राबविली जात असल्याचे ‘एमआयडीसी’ने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)जायकवाडीतील पाण्याच्या वापराचे नियोजन ‘एमआयडीसी’ने केले आहे. औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा करण्यासाठी आता वेळा निश्चित करण्यात आल्या असून, कपात मात्र करण्यात आलेली नाही. वेळापत्रकामुळे उद्योगांना पाण्याची कमतरता भासणार नाही. -आशिष गर्दे, अध्यक्ष, सीएमआयए