शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

गोंडस ग्रामविकास!

By admin | Updated: March 19, 2017 01:21 IST

गावोगावच्या ग्रामपंचायती डिजिटल करण्याचा संकल्प करीत स्मार्ट होण्यासाठी एक स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. रस्ते विकास, कृषी क्षेत्रासाठीची तरतूद आणि जलसंपदा

गावोगावच्या ग्रामपंचायती डिजिटल करण्याचा संकल्प करीत स्मार्ट होण्यासाठी एक स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. रस्ते विकास, कृषी क्षेत्रासाठीची तरतूद आणि जलसंपदा वाढविण्यासाठी भरीव तरतूद हीच ग्रामविकासातील जमेची बाजू आहे; पण थेट ग्रामीण विकासासाठी संकल्पित नवी योजना नाही आणि त्यासाठी भरीव तरतूदही नाही.पंतप्रधान ग्राम सडक योजनेसाठी राज्य सरकारने ५७० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी १६३० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शिवाय सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी रस्त्यांवर खर्च करण्यासाठी सात हजार कोटींची तरतूद केली गेली आहे. यातून ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी मदत होणार आहे. याशिवाय कृषी, जलसंपदा आणि पाणीयोजनांसाठी होणारा खर्च ग्रामविकासाला मदत करेल; पण स्मार्ट ग्राम योजना जाहीर करताना ही गावे विकसित करण्यासाठीची एकत्रित योजना नाही. केवळ स्मार्ट स्पर्धा जाहीर केली आहे. शिवाय डिजिटल गावे करण्यात येणार आहेत, त्याचवेळी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेसाठी केवळ ३०० कोटी रुपयांची तरतूद आहे.‘मनरेगा’ योजनेतील मजुरीत केवळ नऊ रुपयांची वाढ करून आता प्रतिदिन २०१ रुपये मिळणार आहेत. पाच हजार गावांमध्ये जलयुक्त शिवार प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी १२०० कोटींची तरतूद केली आहे. मागेल त्याला शेततळे देण्याचे धोरण आखण्यात आले आहे. त्यातून गावांचा विकास होण्यासाठी मदत होईल; पण पाण्यासाठी तरतूद कमी करून केवळ स्मार्ट ग्रामविकासाचे गोंडस चित्र तयार केले आहे.ठळक तरतुदी... - 28,000 डिजिटल ग्रामपंचायती- 300  कोटी ग्रामीण पाणी योजनांसाठी - मराठवाड्याला १५ कोटी अतिरिक्त निधीची तरतूद- पंतप्रधान ग्रामसडक योजनेसाठी 570 कोटींची तरतूद- 100 कोटी ग्रामीण रोजगार विकासासाठी - शेतीला संरक्षण देण्यासाठी योजना, ‘मनरेगा’ची रोजगार मजुरी १९२ वरून २०१ रुपये- मुख्यमंत्री ग्रामसडकसाठी १६३० कोटींची तरतूद- अवर्षणग्रस्त भागात चार वर्षांत जलप्रकल्प- स्मार्ट सिटीप्रमाणे स्मार्ट ग्राम योजना