शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यात सांडपाणी सोडण्याचा कट उधळला

By admin | Updated: May 18, 2016 03:37 IST

गृहनिर्माण संकुलातील सांडपाणी चोरटया पध्दतीने लगत असलेल्या कालव्यात सोडण्याचा कट शाखा अभियंता सूर्या प्रकल्प यांनी ग्रामस्थांच्या मदतीने उधळून लावला.

निखील मेस्त्री,

पालघर/नंडोरे- अंबाडी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या सत्यम लाईफस्टाईल या गृहनिर्माण संकुलातील सांडपाणी चोरटया पध्दतीने लगत असलेल्या कालव्यात सोडण्याचा कट शाखा अभियंता सूर्या प्रकल्प यांनी ग्रामस्थांच्या मदतीने उधळून लावला.या ग्रामपंचायतीमध्ये सत्यम लाईफस्टाईल ही विकासक कंपनी मोठया प्रमाणावर गृहनिर्माण संकुल उभारत आहे. या संकुलांच्या आवारात साचणारे पाणी सोडण्याची व्यवस्था असूनही ते कोणतीही पूर्वपरवानगी न घेता सूर्या प्रकल्पांतर्गत असलेल्या कालव्याला मोठे भगदाड पडून संकुलातून पाईप टाकून त्याव्दारे ते पाणी कालव्यात सोडण्याचा संबंधित विकासकाचा डाव होता. कालव्याच्या निरीक्षणासाठी या परिसरातून जात असलेले शाखा अभियंता प्रकाश संखे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी या विकासकाला खडसावले व कालव्याला पाडलेले भगदाड त्वरीत बंद करायला लावले. निरीक्षणासाठी आलेल्या शाखा अभियंता व ग्रामस्थांनी मिळून ही कारवाई केली.या विकासकावर केलेली ही कारवाई योग्य असून त्याने पाणी सोडण्यासाठी रितसर जलसंपदा विभागाची परवानगी घ्यायला हवी होती. तसेच हा कालवा शासनाच्या अधिपत्याखाली येत असून पुढे असे कोणी विनापरवानगी व अनधिकृतरित्या कालव्याचे नुकसान केल्यास त्याच्या विरूध्द कठोर शासन करेल असे शाखा अभियंता प्रकाश संखे यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.