शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

दारुच्या नशेत सपासप वार करुन मित्राचा काढला काटा

By admin | Updated: August 10, 2016 12:46 IST

दारुच्या तरर्र नशेत दत्ता मधुकर कदम (२८ रा. बंकटगल्ली, अंबाजोगाई) या तरुणाची मित्रानेच चाकूने सपासप वार करुन हत्या केली.

ऑलाइन लोकमत

बीड, दि. १० -  दारुच्या तरर्र नशेत दत्ता मधुकर कदम (२८ रा. बंकटगल्ली, अंबाजोगाई) या तरुणाची  मित्रानेच चाकूने सपासप वार करुन हत्या केली. ही खळबळजनक घटना अंबाजोगाई येथे मंगळवारी रात्री १० वाजता घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, मयत दत्ता कदम व आरोपी राहुल विष्णू शिंंदे हे दोघे बंकटगल्ली येथे राहत. बांधकामावर मजूर म्हणून काम करणाºया या दोघांत मैत्रीचे नाते होते; पंरतु तीन महिन्यांपूर्वी दत्ताच्या दुचाकीचा धक्का जया शिंदे यांना लागला होता. त्यानंतर जया शिंदे व बालू गोरे यांनी दत्ताच्या घरी येऊन त्याला सुनावले होते.  
 
दरम्यान, मंगळवारी रात्री राहुल शिंदे याने दत्ताला आपल्या घरी नेले. तेथे जुन्या भांडणावरुन दत्ताच्या पोटावर चाकूने सपासप वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मयत दत्ताची आई शालू कदम हिच्या फिर्यादीवरुन शहर ठाण्यात राहुल शिंदेविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद केला. आरोपी अटक असून तपास सहायक निरीक्षक एस. सी. होगले करत आहेत.
 
भरल्या ताटावरुन नेले
 
मयत दत्ता मंगळवारी रात्री साडेआठ वाजता आपल्या घरी जेवण करत होता. यावेळी राहुल शिंदे घरी आला. त्याने दत्ताला बाहेर चल... असे म्हटले. यावेळी शालू कदम यांनी जेवण करुन जा.. असे म्हटले; परंतु दत्ता राहुलसोबत भरल्या ताटावरुन उठून गेला. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. कुटुुंबियांना त्याचा मृतदेहच पहावयास मिळाला.