शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

१५० कोटींच्या खरेदीत १५ कोटींचे सीमाशुल्क बुडविले

By admin | Updated: August 6, 2014 01:10 IST

बेंबळा धरणाच्या डेहणी उपसा सिंचन प्रकल्पाच्या १५० कोटींच्या साहित्य खरेदीत तब्बल १५ कोटी रुपयांचा उत्पादन व सीमाशुल्क बुडविण्यात आल्याचे पुढे आले आहे. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल

डेहणी उपसा सिंचन : अभियंता, कंत्राटदाराकडून जिल्हाधिकाऱ्यांची केली दिशाभूलसतीश येटरे - यवतमाळ बेंबळा धरणाच्या डेहणी उपसा सिंचन प्रकल्पाच्या १५० कोटींच्या साहित्य खरेदीत तब्बल १५ कोटी रुपयांचा उत्पादन व सीमाशुल्क बुडविण्यात आल्याचे पुढे आले आहे. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल करून पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी आणि कंत्राटदाराने संगनमताने हा प्रकार केल्याची माहिती आहे. डेहणी उपसा सिंचन प्रकल्प उभारताना पहिल्या टप्प्यात (फेज -१) बेंबळा धरणातून पाणी उचलणे व ते शेतापर्यंत पोहोचविणे यासाठी पाईपलाईन आणि पंप बसविण्यात आले. ही यंत्रणा उभी करताना वॉल्व्ह, लोखंडी पाईप, पीव्हीसी पाईप, मोटरपंंप, ३३ केव्ही लाईन, व्हीटी पंप, व्हीसीबी, सीआरपी, साटी केबल, गर्डर, एसीएसआर कंडक्टर, सॉफ्ट स्टार्टर, ३३ केव्ही इन्सूलेटर सेंट्रीफिगल पंप आदी १५० कोटी रुपयांच्या ६४ प्रकारच्या साहित्याची खरेदी करण्यात आली. खरेदी करताना एकूण रकमेच्या सुमारे १०.२ टक्के असे १४ कोटी ५० लाख रुपये असा केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क विभागाकडे कराचा (अबकारी) भरणा करणे अपेक्षित होते. परराज्यातून हे साहित्य आयात केल्याने त्यावर सीमाशुल्क आकारण्यात येते. बेंबळाचे उपकार्यकारी अभियंता अनिल सोनेवार यांनी कंत्राटदार कंपनीच्या प्रतिनिधींशी संगनमत करून पर्याय शोधला. सीमाशुल्क माफ करण्यात यावे, यासाठी बेंबळा प्रकल्पाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता किरण हातगावकर यांच्याकडे तो सादर केला. त्यांनीही हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला. जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल करीत या प्रस्तावाला ३ जुलै २००७ ला मंजुरात मिळवून अबकारी कर माफ करून घेतला. ही बाब केव्हातरी उघडकीस येईल, हे संबंधित अभियंत्यांना ठाऊक होते. त्यांनी कंत्राटदार कंपनीकडून केवळ १०० रुपयांच्या स्टॅम्पवर हमीपत्र लिहून घेतले. त्यामध्ये भविष्यात सीमाशुल्क कराचा भरणा करण्याचे आदेश झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ‘आयव्हीआरसीएल’ या कंत्राटदार कंपनीची असेल, असे नमूद करण्यात आले. या संदर्भात येथील बेंबळा प्रकल्प कार्यालयाकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या गंभीर प्रकाराची बारकाईने चौकशी व्हावी, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे. यासंदर्भात बेंबळा प्रकल्प कार्यालयाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता किरण हातगावकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.