शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कस्टमच्या चार लाचखोर उपायुक्तांना अटक, सहा जणांवर सीबीआयची कारवाइ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 05:52 IST

एका व्यापाऱ्याकडून आवश्यक प्रमाणपत्र देण्यासाठी ५ लाखांची लाच घेताना, अबकारी विभागाच्या (कस्टम) चौघा उपायुक्तांसह सहा जणांना

मुंबई : एका व्यापाऱ्याकडून आवश्यक प्रमाणपत्र देण्यासाठी ५ लाखांची लाच घेताना, अबकारी विभागाच्या (कस्टम) चौघा उपायुक्तांसह सहा जणांना सीबीआयने सोमवारी रात्री अटक केली. मुकेश मीना, राजीवकुमार सिंग, सुदर्शन मीना, संदीप यादव या उपायुक्तांसह मनीष सिंग व नीलेश सिंग अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मनीष सिंग हा कस्टममध्ये अधीक्षक असून, नीलेश ही खासगी व्यक्ती आहे. लाचेची रक्कम घेत असताना, केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई शाखेने ही कारवाई केली आहे.या लाच प्रकरणात कस्टममधील अन्य दोघे उपायुक्त व एक अधीक्षक सहभागी आहे. अटक केलेल्या पाच अधिकाºयांची कार्यालये व निवासस्थानांची झडती घेण्यात आली. त्यातून अनेक महत्त्वपूर्ण माहिती हाती लागल्याचे सूत्रांनी सांगितले.कस्टमच्या न्हावा-शेवा येथील विभागीय कार्यालयात एका व्यापाºयाने प्रस्ताव सादर केला होता. त्याला पूरक अभिप्राय देण्यासाठी उपायुक्त मुुकेश मीना व अन्य अधिकाºयांनी ५० लाखांच्या रकमेची मागणी केली. त्यापैकी पाच लाखांचा पहिला हप्ता सोमवारी घेण्याचे ठरले. नीलेश सिंग या सगळ्या व्यवहारात मध्यस्थीचे काम पाहात होता. या व्यापाºयाने याबाबत सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर, पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. लाच प्रकरणात अन्य दोन उपायुक्त व एका अधीक्षकाचाही सहभाग असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. चौघे उपायुक्त तसेच अधीक्षक मनीष सिंग यांच्या कार्यालय व घरातील महत्त्वपूर्ण दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत.