शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

रूढी-परंपरांना तिलांजली

By admin | Updated: April 4, 2015 04:34 IST

आधुनिक व पुढारलेल्या समाजाने स्त्री-पुरुष समानतेच्या कितीही बाजारगप्पा मारल्या तरीही बुरसटलेल्या रूढी-परंपरांचे ओझे अजूनही पुरोगामी महाराष्ट्राच्या खांद्यावर आहे

उमेश जाधव, टिटवाळाआधुनिक व पुढारलेल्या समाजाने स्त्री-पुरुष समानतेच्या कितीही बाजारगप्पा मारल्या तरीही बुरसटलेल्या रूढी-परंपरांचे ओझे अजूनही पुरोगामी महाराष्ट्राच्या खांद्यावर आहे. मात्र, टिटवाळा येथील कल्पिता माधवी ही तरुणी याला अपवाद ठरली. वडिलांना मुखाग्नी (मूठमाती) देऊन एक वेगळाच विचार तिने समाजाला देऊ केला आहे.टिटवाळा येथील गायत्री धाम सोसायटी, सेक्टर १मध्ये माधवी कुटुंब राहते. मूळचे जुन्नरचे आसणारे हे कुटुंब गेल्या चार पिढ्यांपासून खर्डीला वास्तव्यास आले. सुरेश माधवी हे १२ वर्षांपासून टिटवाळ्यात राहत होते. त्यांचे २ एप्रिल रोजी मूत्रपिंडाच्या दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे त्यांची पत्नी आणि एक मुलगी कल्पिता एवढेच कुटुंब. अंत्यविधी करताना मुलानेच वडिलांना मुखाग्नी द्यायचा असतो. मुलगा नसेल तर संबंधित नात्यातील पुरुषाने. मात्र, सुरेश यांना २३वर्षीय कल्पिताने मुखाग्नी देण्याची इच्छा प्रकट केली. तेव्हा अंत्यविधीसाठी जमलेल्या लोकांच्या कपाळावर आठ्या उमटल्या. मात्र, तिने फक्त आपल्या आईची परवानगी घेऊन रूढी-परंपरेला मूठमाती दिली. स्मशानभूमीत सर्व विधी स्वत: कल्पिताने केले. वडिलांना मुखाग्नी दिला. खंबीर मुलाप्रमाणेच आईलाही धीर दिला.