शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

चारा साठवणुकीचे तंत्र आत्मसात करा

By admin | Updated: March 7, 2016 01:14 IST

: दुष्काळी परिस्थिती तीव्र स्वरूप धारण करीत आहे. मराठवाड्यात पिण्यासाठी पाणी नाही. चारा, पाण्याचे संकट मोठे आहे

बारामती : दुष्काळी परिस्थिती तीव्र स्वरूप धारण करीत आहे. मराठवाड्यात पिण्यासाठी पाणी नाही. चारा, पाण्याचे संकट मोठे आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांनी चारा साठवणुकीचे आधुनिक तंत्र आत्मसात करावे, असे आवाहन खासदार शरद पवार यांनी केले. अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे कृषी व पशुसंवर्धन महाविद्यालय व नेदरलॅण्डच्या व्हेन हॉल लारेन्स्टाइन विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने दुग्ध तंत्रज्ञानावर आधारित ‘राक’ प्रकल्पाचा सामंजस्य करार करण्यात आला. त्याचे उद्घाटन शारदानगर येथे आयोजित कार्यक्रमात पवार यांनी केले. पवार म्हणाले, ‘‘येथील ट्रस्टच्या निर्मितीनंतर शेती, पाण्याबरोबरच व्यवसायाची संकल्पना पुढे आली. त्यानंतरच या परिसरात दुग्ध व्यवसाय वाढला. सुरुवातीला २५० ते ३०० लिटर असणारे दूधसंकलन १ लाख लिटरपर्यंत पोहोचले आहे. जगाच्या बाजारपेठेत दुग्धजन्य पदार्थ पाठविण्यासाठी शेतकऱ्यांना आता या कराराचा उपयोग होईल. दुग्ध उत्पादनात हा परिसर पुढे जाईल. भारत अधिक लोकसंख्येचा देश आहे. दुधामध्ये भारत प्रगत असला तरी एका गाईचे सरासरी दुधाचे उत्पादन मात्र खूपच कमी आहे. म्हणूनच जगातील अग्रेसर अशा नेदरलॅण्डच्या सहकार्याने आधुनिक तंत्रज्ञानातून आपल्या देशी गार्इंची पैदास उत्पादनक्षम करण्यावर भर द्यावा लागेल. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा. त्यानंतर आपल्याकडेही गायींच्या दुधाची सरासरी प्रतिदिन ४० ते ५० लिटर होणे शक्य आहे. या वेळी नेदरलॅण्डमधील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच युरोपियन युनियनचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, गिया फार्म टेक्नॉलॉजीचे हेन्क व्हॅन डर वाल, डॉ. आर. के. इवेग आदींनी मनोगत व्यक्त केले. या वेळी विश्वस्त रणजित पवार, सुनंदा पवार, बारामती अ‍ॅग्रोचे सीईओ रोहित पवार, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य नीलेश नलावडे, समन्वयक प्रल्हाद जाधव आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.