शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कॅशलेस पेट्रोलसाठी ग्राहकांना भुर्दंड

By admin | Updated: December 22, 2016 03:38 IST

नोटाबंदीनंतर चलनाचा तुटवडा निर्माण झाल्याने असंख्य वाहनचालकांनी डेबिड, के्रडिट कार्डचा वापर करून त्याद्वारे पेट्रोल भरण्यास

विवेक भुसे / पुणेनोटाबंदीनंतर चलनाचा तुटवडा निर्माण झाल्याने असंख्य वाहनचालकांनी डेबिड, के्रडिट कार्डचा वापर करून त्याद्वारे पेट्रोल भरण्यास सुरुवात केली़ केंद्र सरकारने ९ डिसेंबर रोजी कार्डद्वारे पेट्रोल-डिझेल भरल्यास पाऊण टक्का सवलत देण्याची घोषणा केली़ मात्र, ही सवलत तर दूरच, कार्डद्वारे पेट्रोल भरल्यास ग्राहकाला तब्बल ११़२४ रुपयांचा भुर्दंड पडत असून, ही रक्कम बँका सेवाकर म्हणून वसूल करीत आहेत़ यामुळे पुण्यात दररोज कार्डद्वारे पेट्रोल-डिझेल घेणाऱ्या ग्राहकांना तब्बल ३० लाख रुपयांचा भुर्दंड पडत आहे़ या सेवाकरामुळे बँका मालामाल झाला. कार्डवर पेट्रोल भरल्यानंतर बँकांकडून ग्राहकांना तातडीने मेसेज पाठविला जातो़ जेवढ्या रकमेचे पेट्रोल भरले, तेवढी रक्कम तुमच्या खात्यातून वजा केली असल्याचा मेसेज येतो़ त्यामुळे बहुसंख्य ग्राहकांना या रकमेवर बँका दामदुपटीने सेवाकर आकारत असल्याची माहितीच मिळत नाही़ ग्राहक बँकेत जाऊन पासबुक भरतो, तेव्हा लक्षात येते, की आपण २०० रुपयांचे पेट्रोल भरले असले, तरी प्रत्यक्षात बँकेने २११़२४ रुपये कापून घेतलेले आहे़ याबाबत आॅल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते अली दारूवाला यांनी सांगितले, की बुधवारी सकाळीच किमान १५ जणांचे फोन आले. कार्डद्वारे पेट्रोल भरले तरी सवलत मिळाली नाही; उलट सर्व्हिस चार्जच्या नावाखाली दुप्पट पैसे गेल्याचे सांगितले़ पुणे जिल्ह्यात ५५०, तर पुणे शहरात ३५० पेट्रोलपंप आहेत़ देशभरात ५२ हजार पेट्रोलपंप आहेत़ या पेट्रोलपंपांवर २ लाख लिटर पेट्रोलची विक्री होत असून, दररोज सरासरी १,००० ग्राहक पेट्रोलपंपावर इंधन भरतात़ पेट्रोलपंपचालकाला २०० रुपयांच्या पेट्रोलविक्रीवर ५़८० रुपये कमिशन मिळते़ पेट्रोलची विक्री करणाऱ्या पंपचालकाला जेवढे कमिशन मिळते त्याच्या दुप्पट रक्कम ई-व्यवहाराची सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल बँकेला मिळत असल्याचे दिसून येते़ तसेच, हे सर्व्हिस चार्जचे दर प्रत्येक बँकेचे वेगळे आणि डेबिड व क्रेडिट कार्डसाठीचे दर वेगवेगळे असल्याचे दिसून येते़नाव न सांगण्याच्या अटीवर एका बँक अधिकाऱ्याने सांगितले, की वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळे दर आहेत़ बँकांना ०़५ ते ७ टक्क्यांपर्यंत सर्व्हिस चार्ज घेण्याचा अधिकार आहे़ बँका आपले स्वाइप मशीन देताना पंपचालकांबरोबर करार करतात़ त्यात हा दर किती असेल, हे नमूद केलेले असते़; पण त्याकडे कोणीही लक्ष देत नाही़ आमच्या बँकेच्या ग्राहकांनी ज्या पेट्रोलपंपावर आमचे मशीन आहे तिथे पेट्रोल भरले, तरच त्यांना आमचा दर पडतो़ पण, त्यांनी दुसऱ्या बँकेच्या मशीनद्वारे पैसे अदा केले, तर ही अ‍ॅक्वायर बँक जास्त दर आकारते़ही तर लूट : पेट्रोलपंपचालकांच्या कमिशनपेक्षा सेवाकरासाठी दुप्पट रक्कम घेणे ही तर ग्राहकांची लूट असून, हा प्रश्न देशपातळीवर उठविणार आहोत़ केंद्र शासनाने जाहीर केल्याप्रमाणे हा सर्व्हिस चार्ज रद्द केला पाहिजे़, असे दारूवाला यांनी सांगितले. पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, प्रत्येक पेट्रोल पंपावर सरासरी ८०० ग्राहक कार्डचा वापर करीत असतील, प्रत्येकाकडून ११ रुपये घेतले जातात. पुण्यात ३५० पेट्रोल पंप आहेत़ दररोज बँका सर्व्हिस चार्जच्या नावाखाली सुमारे ३० लाख रुपये ग्राहकांच्या खिशातून काढून घेत आहेत़ ग्राहकांच्या तक्रारी आल्याने बँकेच्या मुख्यालयातून हा सर्व्हिस चार्ज कशा प्रकारे आकारला जातो, आपली बँक किती आकारते, प्रत्यक्ष जास्त सर्व्हिस चार्ज का पडतो, हे ग्राहकांना समजावून सांगावे, असे पत्र आल्याचे एका बँक अधिकाऱ्याने सांगितले़