शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक पंचायतीच्या रडारवर आता ‘बिल्डर लॉबी’

By admin | Updated: June 28, 2016 04:51 IST

सामान्यांच्या बिल्डरविरोधात वाढणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर मुंबई ग्राहक पंचायतीने नवे अभियान हाती घेतले आहे.

मुंबई : दिवसागणिक बिल्डर आणि सामान्यांमध्ये वाढणारे अंतर, सामान्यांच्या बिल्डरविरोधात वाढणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर मुंबई ग्राहक पंचायतीने नवे अभियान हाती घेतले आहे. त्यात राज्यभरातील ‘डिलेड् हाउसिंग प्रोजेक्ट्स’चे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.देशभरात घरखरेदीत ग्राहकांचे हित जोपासणाऱ्या रिअल इस्टेट (नियमन व विकास) कायद्याला मंजुरी देण्यात आली. या कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी मुंबई ग्राहक पंचायतीने पुढाकार घेतला आहे. याकरिता नवे अभियान सुरू करून तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे.या अभियानाच्या प्राथमिक टप्प्यात राज्यातील विलंब झालेल्या गृहनिर्माण प्रकल्पांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर या प्रकल्पांमधील बारीकसारीक त्रुटी जाणून घेऊन त्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात प्रकल्पाविषयी संपूर्ण माहिती, व्यवहार, ठिकाण, घर-वसाहतींची संख्या, यापूर्वी केलेल्या तक्रारींची माहिती, घर ताब्यात येण्याविषयीची माहिती असा सर्व तपशील अंतर्भूत करण्यात आला आहे.ग्राहक पंचायतीने या कायद्याकरिता २० सुधारणा सुचविल्या होत्या. त्यापैकी ग्राहकाभिमुख १८ सुधारणा मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता राज्यात अंमलबजावणीसाठी ग्राहक पंचायत सक्रिय आहे, असे मुंबई ग्राहक पंचायतीच्या अभियान प्रमुख वर्षा राऊत यांनी ‘लोकमत’ला सांगितले.>आठ नियामक आयोगांची स्थापना करा : कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील आठ ठिकाणी नियामक आयोगांची नेमणूक करावी. जेणेकरून, सामान्यांकडून आलेल्या तक्रारींचे विभाजन करणे आणि विभागीय कारवाईची प्रक्रिया सुलभ होईल, अशी मागणी मुंबई ग्राहक पंचायतीची आहे....तर गृहनिर्माण क्षेत्रातील अधिकाऱ्यांची नेमणूक करा : कायद्यातील कलम २०नुसार नियामक आयोग नेमता येत नसेल, तर त्याऐवजी हंगामी स्वरूपात गृहनिर्माण क्षेत्रातील वरिष्ठ गृहनिर्माण अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ग्राहक पंचायतीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.