शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

करी रोड येथील वाणी चाळीला आग

By admin | Updated: May 30, 2016 02:01 IST

करी रोड येथील ना. म. जोशी मार्गावर असलेल्या वाणी चाळ इमारत क्रमांक ३ला रविवारी सायंकाळी आग लागली

मुंबई : करी रोड येथील ना. म. जोशी मार्गावर असलेल्या वाणी चाळ इमारत क्रमांक ३ला रविवारी सायंकाळी आग लागली. आग विझविण्यासाठी वेळेत दाखल झालेल्या अग्निशमन दल आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे जीवितहानी टाळण्यात यश आले.चाळीतील पहिल्या मजल्यावर असलेल्या शेंडूरकर ग्रामस्थ मंडळाच्या खोलीमधील गॅस सिलिंडरला सायंकाळी ७च्या सुमारास आग लागली. दरम्यान, सिलिंडरचा भडका झाल्याने घरातील सर्वांनी चाळीबाहेर धाव घेतली. मात्र सिलिंडरचा स्फोट झाल्याने मजल्याच्या परिसरात वाळत घातलेले कपडे आणि शोभेच्या पताक्यांनी पेट घेतला. त्यामुळे पहिल्या मजल्यावरील सुमारे १० घरे आगीत होरपळली. लोकांची धावपळ सुरू असताना पहिल्या मजल्यावरील एका घरात वृद्ध नागरिक अडकून राहिल्याचे कळाले. चालता येत नसल्याने त्यांना स्वत:चा बचाव करता येईना. अशातच ते बेशुद्ध पडले. मात्र तत्काळ घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या वृद्धाची सुखरूप सुटका केली. त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचली नव्हती. अशावेळी पोलिसांनी तत्परता दाखवत अधिक उपचारासाठी वृद्धाला वायरलेसमधून नायर रुग्णालयात हलवले. रात्री ८च्या सुमारास अग्निशमन दलाने आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले होते. (प्रतिनिधी)