शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

देशात सध्या भगव्या भांडवलशाहीचा विषारी प्रयोग

By admin | Updated: February 29, 2016 04:26 IST

देशात सध्या भगव्या भांडवलीशाहीचा विषारी प्रयोग सुरू आहे, असा गंभीर आरोप राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अभिजित वैद्य यांनी रविवारी केला.

कोल्हापूर : देशात सध्या भगव्या भांडवलीशाहीचा विषारी प्रयोग सुरू आहे, असा गंभीर आरोप राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अभिजित वैद्य यांनी रविवारी केला. अशा परिस्थितीमध्ये धर्मनिरपेक्ष लोकशाही बळकट करण्यासाठी राष्ट्र सेवा दलात कडव्या सैनिकांची फौज वाढविण्याची गरज आहे, असे मतही त्यांनी मांडले. सदर बझारमधील कोरगावकर हायस्कूलमध्ये आयोजित राष्ट्र सेवा दलाच्या अमृतमहोत्सवी मेळाव्यात ‘धर्मांधतेचे धर्मनिरपेक्ष लोकशाहीला आव्हान’ या विषयावरील परिसंवादात वैद्य बोलत होते. या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रजिया पटेल, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा, किसान संघर्ष समितीचे नेते डॉ. सुनीलम यांची प्रमुख उपस्थिती होती.रजिया पटेल म्हणाल्या, धर्मांधताच केवळ धर्मनिरपेक्षतेला आव्हान देत नाही. महाश्रीमंत, समतावादी विचार न पटलेले, राज्यघटना मान्य नसलेले असेही लोक धर्मनिरपेक्ष लोकशाहीवर घाला घालीत आहेत. पन्नालाल सुराणा म्हणाले, ‘सनातन’ची विचारधारा हिंसेला प्रोत्साहन देणारी आहेत. ‘आपला विचार न मानणाऱ्यांना संपवा,’ असे ‘सनातन’च्या गुरूंनी लिहिलेल्या पुस्तकात आहे. त्याच विचारधारेतून डॉ. नरेंद्र दाभोलकर, प्रा. कलबुर्गी यांची हत्या झाली आहे. या वेळी प्राचार्य टी. एस. पाटील यांचे भाषण झाले. (प्रतिनिधी)