शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
4
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना
5
एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू
6
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
7
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
8
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
9
अरे व्वा! “निकाल पाहताच मी आणि माझे वडील खूप रडलो”; पिकअप ड्रायव्हरची लेक झाली SDM
10
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
11
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
12
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना
13
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
14
तुमच्या घरातील सोनं झालं अजून महाग! एकाच दिवसात मोठी वाढ, आजचे दर ऐकून बसेल धक्का!
15
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
17
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
18
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
19
गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' आठवड्यात ९ कंपन्यांचे IPO बाजारात, तुमच्यासाठी 'कोणता' ठरणार फायदेशीर?
20
"वाचल्यावर सर्व कळेल..!"; परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या मेकर्सला दिलं कायदेशीर उत्तर, काय म्हणाले?

समुद्रात ‘करंट’; मासेमारी ठप्प

By admin | Updated: December 25, 2015 23:52 IST

हवामान बदलाचा परिणाम : नौका स्थिरावल्या

मालवण : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर गेले काही दिवस वाऱ्याचा जोर वाढल्याने नौकांनी सुरक्षित बंदरांचा आश्रय घेतला आहे. याचा परिणाम मासेमारीवर झाला असून, मासेमारी ठप्प झाली आहे. मालवणसह सिंधुदुर्गात पर्यटन हंगाम तेजीत असताना माशांची आवक घटल्याने मिळालेल्या मासळीचे दर गगनाला भिडले आहेत.सुरमई, पापलेट, चिंगुळ, आदी बड्या किमतीची व पर्यटकांची मोठी मागणी असलेल्या मासळीला गेल्या काही महिन्यातील सर्वाधिक दर मिळाला आहे. मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने काही हॉटेल व्यावसायिकांकडून गोवा येथूनही मासळी आयात करण्यात आली आहे. हवामानातील हा बदल दोन ते तीन दिवस असाच राहील, असा अंदाज वर्तवला जात आहे. गेले आठ दिवस समुद्रात उत्तरेच्या दिशेने जाणाऱ्या (उपरच्या) वाऱ्याने जोर धरला आहे. समुद्री पाण्याचा प्रवाह दक्षिण दिशेने जोरदार वाहत आहे. याला मासेमारी भाषेत पाण्याला ‘करंट’ मारणे असे म्हणतात. या हवामानातील बदलामुळे सुरक्षेच्या कारणास्तव काही नौका मालवण, सर्जेकोट, देवगड व अन्य बंदरात स्थिरावल्या आहेत. वाऱ्याचा परिणाम मासेमारीवरही झाला आहे. (प्रतिनिधी)गोव्यातून मासळी आयात पर्यटकांची मोठी मागणी असलेली पापलेट, सुरमई, चिंगुळ, आदी मासळीचे दर गगनाला भिडले आहेत. ३०० ते ४०० रुपये किलोच्या दराने मिळणारी सुरमई ८०० ते ९०० रुपये बाजारभावाने मिळत आहे. बाजारात गोवा मार्केट येथून मासळी आयात करण्याची वेळ आली आहे. पर्यटकांची मागणी लक्षात घेता काही व्यावसायिक गोवा येथील मासळी देत आहेत. समुद्रातील हा बदल आणखी काही दिवस असाच राहील. चार्जींगला लावून ठेवण्यात आलेली तिकीट यंत्रे जळून खाक झाली.आगीचे कारण गुलदस्त्यातशॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याबाबत एस्. टी.चे अधिकारी चौकशी करीत आहेत.ड्युटीवर असूनही गैरहजेरीवाहक, चालक नेहमीप्रमाणे सकाळपासून ड्युटीवर हजर होते. मात्र तिकीट यंत्रे बाद झाल्यामुळे व तिकीट ट्रे उपलब्ध नसल्यामुळे वाहक, चालकांना बसून रहावे लागले. संगणकावर तिकीट ट्रेचे अपडेट घेऊन तिकीट ट्रे वाहकांच्या ताब्यात देण्यात येत होते. परंतु फेऱ्या जाऊ न शकलेल्या चालक, वाहकांची हजेरी प्रशासनाकडून लावून घेण्यात असमर्थता दर्शविण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. कर्मचाऱ्यांची चुकी नसताना अचानक उद्भवलेल्या या प्रसंगामुळे प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना वेठीस धरणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांमधून उमटत होत्या. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे रत्नागिरी आगार सचिव बी. ए. विश्वासराव यांनी आगार व्यवस्थापकांना निवेदन देऊन हजेरी लावण्याची विनंती केली आहे.