शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सध्याचा कालखंड धार्मिक विद्वेषाचा

By admin | Updated: January 4, 2016 03:15 IST

सध्याचा कालखंड धार्मिक, जातीय विद्वेषाने भरलेला असून, राज्यघटनेची चौकट बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. धर्मनिरपेक्षतेचा आग्रह धरणे म्हणजे स्वत:वर गोळ्या झाडण्यासाठी आमंत्रण देण्यासारखे झाले

नाशिक : सध्याचा कालखंड धार्मिक, जातीय विद्वेषाने भरलेला असून, राज्यघटनेची चौकट बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. धर्मनिरपेक्षतेचा आग्रह धरणे म्हणजे स्वत:वर गोळ्या झाडण्यासाठी आमंत्रण देण्यासारखे झाले आहे. अशा काळात धर्मनिरपेक्षतेची चळवळ जिवंत राहण्यासाठी प्राणपणाने लढा चालू ठेवण्याची, महाराष्ट्र व कर्नाटकातील पुरोगामी चळवळींनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी रविवारी मांडले. सिडकोतील कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार व आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण परशुराम साईखेडकर नाट्यगृहात करण्यात आले, त्यावेळी डॉ. दाभोलकर बोलत होते. कार्यक्रमात पुरोगामी विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या शिष्या आणि कर्नाटकातील बंडखोर कवयित्री सुकन्या मारुती यांना सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. दाभोलकर म्हणाले, अनेक महिने उलटूनही दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांचा तपास लागलेला नाही. अशा कालखंडात मारुती यांचा गौरव परिवर्तनासाठीचा लढा थांबवणार नसल्याचा निर्धार व्यक्त करणारा आहे. महाराष्ट्र व कर्नाटकातील विचारवंतांना संपवले, तरी घाबरून न जाता दोन्ही राज्यांतील पुरोगामी कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या हातात हात देऊन पुढे वाटचाल करावी व देशातील सनातन्यांसमोर उदाहरण उभे करावे, असे ते म्हणाले.