शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

कुतुहलाने दाखविला प्रशासकीय सेवेचा मार्ग- नेहा भोसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 04:06 IST

ध्येय निश्चित करून त्यावर लक्ष केंद्रित केले की, यश नक्कीच मिळते. मात्र त्यासाठी वेळ देणे व कष्ट करण्याची आवश्यकता आहे- नेहा भोसले

- मेहरून नाकाडे रत्नागिरी : खासगी नोकरी करता करता कुतुहलातून प्रशासकीय सेवेचा मार्ग दिसला आणि त्यासाठी घेतलेल्या कष्टाने यशही मिळाले, अशी भावना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात १५ वा तर राज्यात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या नेहा भोसले हिने व्यक्त केली. खेड तालुक्यातील खोपी गावची कन्या असलेल्या नेहाशी, तिचा प्रवास आणि तिच्या यशाबाबत साधलेला थेट संवाद!प्रश्न : एमबीए पूर्ण केल्यानंतर युपीएससीकडे कशा वळलात?उत्तर : एमबीएनंतर दिल्ली येथील एका खासगी कंपनीत तीन वर्षे नोकरी करीत असताना, विविध प्रकल्प तयार करून सादरीकरण करण्याची संधी प्राप्त झाली. त्याचवेळी प्रशासकीय सेवेबाबत कुतूहल निर्माण झाले व केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षेचा अभ्यास करण्याचे निश्चित केले. तातडीने नोकरीचा राजीनामा देऊन पूर्णपणे युपीएससीच्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत केले.प्रश्न : पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले का?उत्तर : हो, युपीएससीचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीतच थांबले होते. तेथे मार्गदर्शन वर्ग लावला होता. दररोज दहा ते बारा तास अभ्यास सुरू होता. दोन वर्षांच्या अभ्यासानंतर मात्र पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले.प्रश्न : इंग्रजी भाषा व यूपीएससी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये भीती आहे का?उत्तर : इंग्रजी भाषेविषयी अनेकांना न्यूनगंड असतो, मात्र तो असू नये. यूपीएससी ही भाषेची नाही, तर ज्ञानाची व व्यक्तिमत्वाची परीक्षा जरूर आहे. या परीक्षेसाठी पैसा खूप लागतो, असाही गैरसमज आहे. त्यापेक्षा योग्यवेळी योग्य मार्गदर्शन मिळणे महत्त्वाचे आहे. शहरीबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यूपीएससीचा अभ्यास करायचा असेल तर इंटरनेटवरही खूप सारी माहिती उपलब्ध आहे, शिवाय आॅनलाईन मार्गदर्शन वर्गही सुरू आहेत. मात्र योग्य पर्यायाची निवड महत्त्वपूर्ण आहे.शिक्षण मुंबईतनेहाचे आई-वडील मुंबईतच स्थायिक असल्याने तिचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण मुंबईत झाले. बारावी विज्ञान शाखेतून पूर्ण केल्यानंतर मुंबई विद्यापीठाची अभियांत्रिकीची पदवी विशेष प्राविण्यासह संपादन केली. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट लखनौ येथे विशेष गुणवत्ता मिळवत एमबीए पूर्ण केले. तीन वर्षे नोकरी केल्यानंतर यूपीएससीची परीक्षा दिली आणि नेत्रदीपक यश मिळवले.नियोजन गरजेचेयूपीएससीचा अभ्यास कठीण नक्की आहे, परंतु ध्येय निश्चित केले की, यश हे मिळतेच. अर्थात त्यासाठी कष्ट करण्याची तयारी व वेळेचे नियोजन महत्त्वपूर्ण आहे. मी दररोज दहा ते बारा तास अभ्यास सुरू ठेवला होता. त्यासाठी दिल्लीतच जाण्याची गरज नाही, तर आॅनलाईन पीडीएफ स्वरूपातही माहिती उपलब्ध झाली. अर्थात अभ्यासावरच लक्ष केंद्रित करायला हवे, असेही ती आवर्जून सांगते.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग