शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कुरकुंभची पाणी समस्या गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2017 01:28 IST

महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्राकडून मिळणाऱ्या पाण्यावरच अवलंबून असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना कुरकुंभ ग्रामपंचायत याबाबत मात्र गंभीर नसून कुरकुंभ आजदेखील महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्राकडून मिळणाऱ्या पाण्यावरच अवलंबून असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याचा वापर वाढला असून, त्याचा पुरवठा करणे मात्र नियंत्रणाबाहेर जात असल्याचे दिसते. गावातील नागरिक पूर्णपणे फक्त याच एका पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून असून, दुष्काळी परिस्थितीत ही समस्या मोठी होत आहे.कुरकुंभला असणारा रासायनिक प्रकल्प हा इथल्या पाण्याच्या समस्येचे प्रमुख कारण आहे. कुरकुंभ व परिसरातील गावांना याचा प्रामुख्याने दुष्परिणाम भोगावा लागत असून, गेली २५ वर्षे यावर कुठल्याच प्रकारचा सकारात्मक कार्यक्रम राबविण्यात आलेला नाही. कुरकुंभला होणारा पाणीसाठा हा सध्या येथील महाराष्ट्र औद्योगिक मंडळाकडून होत आहे. तोदेखील त्यांना उपलब्ध असणाऱ्या पाणीसाठ्यावर अवलंबून आहे. त्यामुळे जर त्यांनी पाणी दिले, तरच कुरकुंभला पाणी मिळणार, अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे व या रासायनिक प्रकल्पाचा परिणाम भोगत असणाऱ्या पांढरेवाडी या गावालादेखील अशीच काहीश्ी स्थिती पाहायला मिळते.कुरकुंभ ओद्योगिक क्षेत्राला वरवंड येथील व्हिक्टोरिया तलावातून पाण्याचा पुरवठा केला जातो व त्याद्वारे कुरकुंभ व पांढरेवाडीलादेखील पुरवठा होतो. मात्र, उद्योगाला पाणी कमी पडण्यास सुरुवात झाली, की गावाचा पाणीपुरवठादेखील कमी केला जातो. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होते. मागील वर्षीच्या दुष्काळात कुरकुंभच्या जनतेला अक्षरश: रासायनिक पाण्याचा वापर करावा लागला, तर पिण्याचे पाणीदेखील जवळपास तीन महिने विकत घ्यावे लागले. या सर्व प्रकारात सर्वसामान्य जनता भरडली जात असून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, ज्या तलावातून पाणीसाठा उपलब्ध होत आहे, त्यातच राखीव साठा असणे गरजेचे आहे; अन्यथा मागील दुष्काळात ज्या गावांना पाणी नाही, त्यांना यातूनच पुरवठा केला गेल्यामुळे कुरकुंभला पाणी मिळणे कठीण झाले होते. (वार्ताहर)>पाणी आहे; मात्र दूषितकुरकुंभ गावात पाण्याचा साठा बहुतांश ठिकाणी उपलब्ध आहे; मात्र त्याचा उपयोग दैनंदिन गरजा भागविण्यासाठीदेखील करता येत नाही. गावात असणाऱ्या विहिरी, बोअरवेल व अन्य साधने मोठ्या प्रमाणात दूषित असून त्यामध्ये फेसाळलेले व उग्र वास असणारे पाणी आहे, जे हातात सुद्धा घेता येत नाही. त्यामुळे अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण होते. यामुळे मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवण्याची गरज आहे. याबाबत कुठलीच योजना सध्या तरी दिसून येत नाही. त्यामुळे कुरकुंभला पाण्याचा राखीव साठा मिळणे अत्यंत आवश्यक आहे.