शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अवजड वाहनांना आजपासून १४ तास बंदी

By admin | Updated: August 15, 2016 03:54 IST

ठाणे शहर नियंत्रण वाहतूक शाखेने स्वातंत्र्यदिनीच शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व शहरांमध्ये अवजड वाहनांना २४ तासांसाठी बंदी घातली आहे

ठाणे: वाहतूककोंडी सोडवण्यासाठी ठाणे शहर नियंत्रण वाहतूक शाखेने स्वातंत्र्यदिनीच शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व शहरांमध्ये अवजड वाहनांना २४ तासांसाठी बंदी घातली आहे. ही बंदी तब्बल तीन महिन्यांपर्यंत लागू राहणार आहे. तसेच काही ठिकाणी निर्बंधही घातले असून त्यावेळेत पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करीत शहरांतर्गत वाहतूक करायची असल्यास अशा वाहनांनी रात्री १० ते सकाळी ८ या वेळेत वाहतूक करता येणार आहे.शहरात सर्व वाहनांना २४ तास प्रवेश असल्यामुळे शहराबाहेरून येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण पडतो. या कोंडीत शाळेत जाणारी मुले, नोकरी धंद्यानिमित्ताने बाहेर पडणारी मंडळी, रुग्णवाहिका तसेच जीवनावश्यक सोयीसुविधा पुरवणारी छोटी वाहने अडकून पडतात. या वाहनांना सुकर मार्गक्रमण करण्यासाठी शहराबाहेरून येणाऱ्या अवजड वाहनांना (सहापेक्षा जास्त चाके असणाऱ्या वाहनांना) गर्दीच्या काळात शहराबाहेर रोखण्याचा एक महिन्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतला होता. याचदरम्यान, आलेले अभिप्राय आणि सूचनांनुसार पुन्हा वाहतूक चार भागांत विभागण्याचे ठरवून तीन महिन्यांसाठी नवीन अधिसूचना वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप पालवे यांनी काढली आहे. (प्रतिनिधी)>दोन टप्प्यांतील अवजड वाहतूक बंदसकाळी ८ ते दुपारी ११ व सायंकाळी ५ते रात्री १० वाजेपर्यंत या दोन टप्प्यांत (सहापेक्षा जास्त चाक ी)अवजड वाहनांना १) राष्ट्रीय महामार्ग क्र मांक-३वरील वडपे-राजनोली-माणकोली-खारेगाव ते आनंदनगर टोलनाकामार्ग, २) राष्ट्रीय महामार्ग क्र मांक-४वरील दहिसर मोरी-कल्याण फाटा ते मुंब्राबायपासमार्गे खारेगाव टोलनाकादरम्यान ३) राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ४२ घोडबंदर रस्ता ४) बदलापूर-अंबरनाथ-काटईफाटा ५) म्हापे-शीळफाटा या पाच रस्त्यांवर बंदी घातली आहे. या वाहनांनी दुपारी ११ ते ५ आणि रात्री १० ते सकाळी ८ या दोन टप्प्यांत वाहतूक करता येणार आहे. >१४ तास अवजड वाहतूक बंदसकाळी ८ ते रात्री १० अशी १४ तास शहरातील चार प्रमुख रस्त्यांवर अवजड वाहनांना १) भिवंडी-रांजनोलीनाका-दुर्गाडी-खडकपाडा (भिवंडी-मुरबाड रस्ता) २) राज्य महामार्ग क्र मांक ४० दुर्गाडी ते कल्याण फाटा (कल्याण-शीळफाटा रस्ता) ३) कापूरबावडी सर्कल-बाळकुम- कशेळी टोलनाका-अंजूरफाटा-वंजारपट्टी (भिवंडी-वाडा रस्ता)४) माणकोली-अंजूरफाटा-कारिवली-खारबांव-वसईरोडकडे जाणार रस्ता (चिंचोटी-अंजूरफाटा रस्ता) बंदी घालण्यात आली असून या मार्गावर रात्री १० ते सकाळी ८ या वेळात अवजड वाहनांना वाहतूक करता येणार आहे.