शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

संस्कृतीच्या घरची चूलही पेटलीच नाही...

By admin | Updated: March 3, 2015 00:27 IST

एक उदास रात्र... : बेपत्ता झालेल्या बालिकेच्या शोधासाठी अख्खा गाव पोलिसांच्या मदतीला

देवरुख : वय केवळ १ वर्ष आठ महिने... निरागस गोड हसरा चेहरा. बोलायला न लागलेली एक चिमुरडी दुकानाजवळून आईचा हात सोडून अनाकलनीयरित्या गायब होते आणि आई-कुटुंबांसह गावातील ग्रामस्थांच्या जीवाची घालमेल उडते. रविवारी दुपारच्या सुमारास संगमेश्वर तालुक्यातील कडवई - धुळपवाडी येथे ही घटना घडली. तत्काळ कर्णोपकर्णी झाली. कुटुंबीय, नातेवाईक, ग्रामस्थांसह पोलिसांची एकच धावपळ! त्या रात्री त्या घरातील चूल पेटलीच नाही.संस्कृती शशिकांत धुळप ही चिमुरडी साऱ्यांच्याच काळजाचा ठोका चुकवून गायब झाली. तब्बल रविवारी दुपारी २ वाजल्यापासून सलग १५ तास म्हणजेच सोमवारी पहाटे ५ वाजेपर्यंत शोध मोहीम करण्यात आली. पाऊस, थंडी वारा आणि रात्री काळोख असा सामना करीत अखंड शोध सुरु होता.संस्कृती ही कष्टकरी कुटुंबातील धुळप कुटुंबियांची मोठी मुलगी. रविवारी घरातील मंडळी म्हणजेच आजी, काका-काकी आणि वडील नातेवाईकांच्या लग्नाला गावाशेजारी गेलेले. यावेळी घरात फक्त तिघेच. संस्कृतीसह तिचा ४-५ महिन्यांचा लहान भाऊ आणि आई शमिका धुळप होती. घरी दुपारच्या वेळेस आवश्यक असणारा जिन्नस आणायला म्हणून घराच्या बाजूलाच मायलेकी बाहेर पडल्या होत्या. मात्र, यावेळी बोट धरुन आईसोबत बाहेर पडलेली चिमुरडी संस्कृती आईबरोबर सोबत घरी परतलीच नाही.यावेळी मात्र संस्कृतीच्या आईच्या काळजाचे पाणी झाले. घरी पाळण्यात ४ महिन्यांचा लहान मुलगा होता. याला घेऊन या मुलीला शोधायचे कसे, असा मोठा प्रश्न उभा राहिलेला. घरातील सगळे लग्नाला गेलेले अशा परिस्थितीत मनाला धीर देत शमिकाने मोबाईलच्या सहाय्याने पतीला झाला प्रकार सांगितला. कशाचीही तमा न बाळगता स्थानिक युवक, गावकरी ग्रामस्थ आणि कुटुंबियांसह नातेवाईकांनी वाडी, वस्ती, गाव जंगल पालथे घातले. मात्र, १५ तासांच्या अथक प्रयत्नांनंतरदेखील संस्कृती सापडली नाही.रात्री संस्कृतीच्या घरची चूल पेटली नाही. उपाशीपोटीच या मुलीचा शोध सुरु होता. मात्र, या साऱ्या मोहिमेनंतर हतबल होऊन परत आलेल्या ग्रामस्थांना कुटुंबियांना चांगली बातमी मिळाली आणि गंगाराम धुळप-तुकाराम उजगावकर या ग्रामस्थांना संस्कृतीचे रडणे ऐकू आले. घरापासून सुमारे दीड ते पावणेदोन किमी अंतरावरील जंगलात ही चिमुरडी सुरक्षित सापडल्याने साऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. सर्वाधिक आनंद होता तो तिच्या चेहऱ्यावर! (प्रतिनिधी)