शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
7
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
8
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
9
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
10
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
11
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
12
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
13
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
14
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
15
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
16
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
17
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
18
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
19
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
20
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली

सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

By admin | Updated: September 3, 2014 23:59 IST

पुढील दोन महिन्यांत येऊ घातलेली विधानसभा निवडणूक आदी कारणांनी सासवडमधील बहुतांश गणोश मंडळांनी साधेपणाने गणोशोत्सव साजरा करण्यावर भर दिला आहे.

सासवड : यंदा उशिराने बरसलेला पाऊस, त्यामुळे निर्माण झालेली दुष्काळदृश परिस्थिती, वाढती महागाई, पुढील दोन महिन्यांत येऊ घातलेली विधानसभा निवडणूक आदी कारणांनी सासवडमधील बहुतांश गणोश मंडळांनी साधेपणाने गणोशोत्सव साजरा करण्यावर भर दिला आहे. 
शहरात 35 सार्वजनिक मंडळे  व ब:याच प्रमाणावर बाल मंडळेदेखील हा सोहळा उत्साहात साजरा करीत असल्याचे चित्न आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने मंडळाच्या कार्यकत्र्याचा उत्साह वाढला आहे. पुढील चार दिवसांत हा सोहळा अधिक लक्षवेधी होत जाईल आणि सोमवारच्या विसर्जन मिरवणुकीत या गौरवशाली सोहळ्याची सांगता होईल.
यंदा 75वे वर्ष साजरे करणा:या कुंभारवाडय़ातील संत गोरा कुंभार मंडळाने ‘बाजी प्रभूंनी लढविली पावन खिंड’  हा सात मूर्तीचा भव्य हलता देखावा उभारला आहे. गणोश धानेपकर या वर्षी या मंडळाचे अध्यक्ष आहेत. सोपाननगरमधील मानाचा समजल्या जाणा:या व आपले 27वे वर्ष 
साजरे करणा:या अखिल सोपाननगर मंडळाने या वर्षी 11 मूर्तीचा समावेश असणा:या ‘खंडोबाची पालखी’ 
या भव्य हलत्या देखाव्याची 
उभारणी केल्याचे मंडळाचे अध्यक्ष विश्वजित आनंदे यांनी सांगितले. 
उद्या (गुरुवारी) सायंकाळी आचार्य अत्ने सांस्कृतिक भवनात मंडळाच्या वतीने महिलांसाठी खास ‘जल्लोष महाराष्ट्राचा’ या ऑर्केस्ट्राचे आयोजन केले असल्याचे मंडळाचे कार्याध्यक्ष विजय ताकवले यांनी सांगितले.
25वे वर्ष साजरे करणा:या येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाने होम मिनिस्टर स्पर्धा, मुलांसाठी क्रीडास्पर्धा आदी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले 
असल्याचे राजेंद्र अद्वैत यांनी सांगितले. सोपाननगर येथीलच ओम साई मंडळाचे हे 19वे वर्ष असून, 
मंदिर उभारणीमुळे साधेपणाने उत्सव करीत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष गौरव साळुंके व कार्याध्यक्ष विजय जगताप यांनी सांगितले. याच परिसरातील 14वे वर्ष साजरे करणारे वीर मुरारबाजी मंडळ साधेपणाने सोहळा साजरा करीत असल्याचे अध्यक्ष अजित विनायक पवार 
यांनी सांगितले. नागरिकांसाठी सर्पमित्न पी. के. पवार यांचा कार्यक्रम व अखेरच्या दिवशी महाभोजनाचा कार्यक्रम ठेवल्याचेही पवार यांनी सांगितले.
चांदणी चौक मंडळाने या वर्षी 18 फुटी श्रीदत्त मूर्तीची प्रतिष्ठापना केली असून, स्थानिक मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा आयोजन केल्याचे मंडळाचे अध्यक्ष भगवान पवार यांनी सांगितले. 
येथील अजय मंडळाने या वर्षी 
विविध सामाजिक उपक्रमांद्वारे 
हा उत्सव साजरा करण्याचे ठरविले असून, अध्यक्ष प्रवीण पवार यांच्या मार्गदशर्नाखाली दररोज विविध कार्यक्रम होतात. विद्यार्थी दत्तक योजना, विविध आश्रम, वसतिगृहांना धान्यवाटप, ढोल साहित्यवाटप, मुलांकरिता नाटय़स्पर्धा आदी कार्यक्रम वर्षभर या मंडळाच्या वतीने राबविले जातात.
सासवडचा प्रति-दगडूशेठ समजला जाणारा येथील अमर मंडळाने या वर्षी ‘श्रीं’ची आकर्षक मूर्ती स्थापन करून दहा दिवस केवळ भक्तिगीते लावण्याचा संकल्प केल्याचे मंडळाचे अध्यक्ष संजय चव्हाण यांनी सांगितले. मंडळाची दर वर्षी पालखीतून विसर्जन मिरवणुकीची परंपरा याही वर्षी कायम असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.
जगतापआळीतील छत्नपती शिवाजी मंडळ तसेच नेताजी चौकातील नेताजी सुभाष मंडळ, दत्तनगरमधील शिवगर्जना मंडळ, सोपाननगर रस्त्यावरील जयहिंद मंडळ, साठेनगरातील संदीप  मंडळ, बोरावकेआळीतील साईनाथ मंडळ, अखिल भाजी मंडई मंडळ, एसटी बस स्थानकासमोरील हिंदसेना मंडळ, पोलीस वसाहतीसमोरील सिद्धिविनायक मंडळ, वाढीव हद्दीतील अखिल तारादत्त मंडळ, स्वराज मंडळ इ. विविध मंडळे या वर्षी साधेपणाने उत्सव साजरा करीत आहेत. सर्वत्न शांततेत व उत्साहात उत्सव सुरू आहे. सासवड पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेण्यात आला आहे. (वार्ताहर)