शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कळंबा तलावात सापडला शाहूपूर्वकालीन पाण्याचा पाट

By admin | Updated: April 11, 2016 03:13 IST

येथील ऐतिहासिक कळंबा तलावात गाळ काढण्याचे काम सुरू असताना शनिवारी दुपारी सुमारे अडीचशे वर्षांहून अधिक जुना शहराच्या पहिल्या पाणी योजनेच्या पाण्याचा पाट आढळला.

कोल्हापूर : येथील ऐतिहासिक कळंबा तलावात गाळ काढण्याचे काम सुरू असताना शनिवारी दुपारी सुमारे अडीचशे वर्षांहून अधिक जुना शहराच्या पहिल्या पाणी योजनेच्या पाण्याचा पाट आढळला. तो पाहण्यासाठी लोकांची गर्दी उसळली होती. महापौर अश्विनी रामाणे व उपसरपंच दीपक तिवले यांनी गाळ काढण्याचे काम थोडा वेळ थांबवून पाट रिकामा करण्याच्या सूचना दिल्या. चुनखडीच्या बांधकामातील दोन बाय दोन फूट लांबी-रुंदीचा अतिशय सुंदर घडण असलेला हा पाट आहे.तलावाच्या इतिहासात प्रथमच यंदा पाऊसमान कमी झाल्यामुळे कळंबा तलाव पूर्णत: आटला आहे. यामुळे जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जलसंपदा विभागातर्फे तलावातील गाळ काढण्याचे काम गेले तीन आठवडे सुरू आहे. दुपारी पोकलँडच्या साहाय्याने गाळउपसा सुरू असताना, चालक कुमार गोरंबेकर यांना हा पाट दिसून आला. त्यांनी ही माहिती उपसरपंच दीपक तिवले यांना दिली. शाहूपूर्वकालीन असलेला हा पाट गाळाच्या खाली सात फूट ढिगाखाली होता. हा पाट आजही मजबूत व पाणी वाहून जाईल, असा आहे. त्यामध्ये पाणी होते. त्यास खापरी नळ योजना, असेही म्हटले जाते.जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्यायनी मंदिराच्या पिछाडीस अमृत, राम, परशुराम ही कुंडे आहेत. ज्यातील पाणी प्रदूषणविरहित असे. कोल्हापुरात १७६० मध्ये २१ तळी होती, पण नागरी प्रदूषणामुळे पाणी पिण्यास योग्य नव्हते. रंकाळ््याचे पाणी पिण्यास चांगले होते, परंतु पूर्ण क्षमतेने शहरात पुरवठा करता येत नव्हता. पुण्याच्या बाबुराव केशव ठाकूर या व्यापाऱ्याची महालक्ष्मीवर श्रद्धा होती. शहरातील पाण्याची अडचण समजून घेऊन त्यांनी कात्यायनीतील कुंडातील हे पाणी पाटाद्वारे शहरात आणण्याची योजना आखली. तीन लाख रुपये खर्च करून हे पाणी नळावाटे महालक्ष्मी मंदिरातील दोन हौदात व शहरात ३२ विहिरींमध्ये सोडले होते. तोच हा पाट सापडल्याने अडीचशे वर्षांपूर्वीच्या इतिहासास उजाळा मिळाला. तलावात पाट सापडल्याचे दुपारी गावात समजताच ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेतली. पाट बघण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.घटनास्थळी माजी नगरसेवक मधुकर रामाणे, नगरसेविका दीपा मगदूम, पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड आदींनी भेट दिली व पाटाची माहिती घेतली. (प्रतिनिधी)