शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सीएसटी मोफत पाहण्याची संधी

By admin | Updated: July 1, 2016 04:31 IST

वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा प्राप्त असलेले सीएसटी स्थानक आणि त्यातील म्युझियम पाहण्यासाठी मध्य रेल्वेकडून शुल्क आकारले जाते.

मुंबई : वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा प्राप्त असलेले सीएसटी स्थानक आणि त्यातील म्युझियम पाहण्यासाठी मध्य रेल्वेकडून शुल्क आकारले जाते. मात्र २ जुलैपासून मध्य रेल्वेकडून हेरिटेज सप्ताह साजरा केला जाणार असून ८ जुलैपर्यंत सीएसटीला भेट देणाऱ्यांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. २ जुलै २00४ रोजी सीएसटी स्थानकाचा युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजच्या यादीत समावेश करण्यात आला. वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा प्राप्त असणारे मुंबईतील हे एकमेव स्थानक ठरले. या स्थानकाला मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असतात. आता स्थानकात २ जुलैपासून मध्य रेल्वेकडून ‘हेरिटेज सप्ताह’ साजरा केला जाणार असून तो ८ जुलैपर्यंत सुरू राहील, अशी माहिती अपर महाव्यवस्थापक ए.के. श्रीवास्तव यांनी दिली. या सप्ताहात हेरिटेज वॉक, प्रदर्शन, सीएसटी येथील मुख्यालयाच्या डायनिंग हॉलमध्ये चर्चात्मक कार्यक्रमांचे आयोजनही केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सीएसटी स्थानकाला भेट देणाऱ्यांसाठी २ जुलै ते ८ जुलैपर्यंत कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. त्यांना सीएसटीचे अंतर्गत बांधकाम आणि म्युझियमही पाहता येईल, असेही श्रीवास्तव म्हणाले. (प्रतिनिधी)>२ जुलै रोजी सकाळी ९ वाजता ‘हेरिटेज वॉक’ आणि प्लॅटफॉर्म क्रमांक सात आणि आठवर प्रदर्शन असेल.३ जुलै रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘हेरिटेज वॉक’ आणि रेल्वे विषयासंदर्भात प्रश्नमंजुषा होईल. ४ जुलै रोजी सीएसटी डायनिंग हॉलमध्ये हेरिटेजशी संबंधित तज्ज्ञांचा चर्चात्मक कार्यक्रम होणार आहे. ५ जुलै ‘मुंबई आणि रेल्वे’ या विषयावर रफिक बगदादी यांच्याशी चर्चा.७ जुलै रोजी जे.जे. स्कूल आॅफ आर्ट्सचे संचालक राजीव मिश्रा आणि संवर्धन वास्तुविशारद विकास दिलावरी यांची चर्चा होईल.८ जुलै रोजी ‘चित्रपट आणि रेल्वे’ विषयावर चर्चा होणार आहे.