शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सीएसएमटी, माथेरान स्थानकांत स्तनपान कक्ष - मध्य रेल्वेचा निर्णय

By admin | Updated: July 7, 2017 19:45 IST

रेल्वे प्रवासादरम्यान महिलांना शिशुंसाठीच्या स्तनपानाकरिता अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. परिणामी यावर सारासार विचार करत मध्य रेल्वे प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी

- महेश चेमटे/ऑनलाइन लोकमत
 
मुंबई, दि. 07 -  रेल्वे प्रवासादरम्यान महिलांना शिशुंसाठीच्या स्तनपानाकरिता अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. परिणामी यावर सारासार विचार करत मध्य रेल्वे प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि माथेरान स्थानकात स्तनपान कक्ष उभारण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ‘ए-१’ आणि ए दर्जाच्या स्थानकांत टप्प्या टप्प्याने स्तनपान कक्ष उभारण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानूसार देशातील विविध रेल्वे स्थानकांवर स्तनपान कक्ष उभारण्यात येणार आहे. त्यानूसार सुरुवातीला ‘ए-१’ आणि ए दर्जाच्या रेल्वे स्थानकात स्तनपान कक्ष उभारण्यात येणार आहे. स्थानकातील ‘प्रतिक्षालय’ अर्थात ‘वेटिंग रुम’ मध्ये हे स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार आहे. ज्या स्थानकांवर प्रतिक्षालय नाही. त्या स्थानकांवर महिला प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेत स्तनपान कक्ष उभारण्यात येणार आहे. 
पहिल्या टप्प्यात मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे स्तनपान कक्ष उभारण्यात येणार आहे. तर पर्यटकांचे नंदनवन समजल्या जाणा-या आणि टॉय ट्रेनसाठी प्रसिद्ध असलेल्या माथेरान स्थानकात स्तनपान कक्ष उभारण्यात येणार आहे. दुस-या टप्प्यात लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण, पनवेल, लोणावळा आणि इगतपूरी या मरेच्या स्थानकांवर महिलांसाठीच्या विशेष सेवा देण्यात येणार आहे.