शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
11
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
12
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
13
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
14
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
15
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
16
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
17
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
18
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
19
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
20
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

अति धोकादायक इमारती जमीनदोस्त

By admin | Updated: June 30, 2015 03:06 IST

ठाणे महापालिकेची अतिधोकादायक इमारतीवरींल कारवाई अद्याप सुरुच आहे. पालिकेने आतापर्यंत ५८ पैकी ३६ इमारतींवर हातोडा टाकला आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेची अतिधोकादायक इमारतीवरींल कारवाई अद्याप सुरुच आहे. पालिकेने आतापर्यंत ५८ पैकी ३६ इमारतींवर हातोडा टाकला आहे. विशेष म्हणजे यादीत समाविष्ट नसलेल्या परंतु ज्या मोडकळीस आल्या आहेत, अशा सात ते आठ इमारतींवरही कारवाई केली आहे. परंतु, दुसरीकडे पावसाळ्याचा पहिला महिना संपला तरीदेखील मुंब्य्रातील कारवाईचा वेग फारसा वाढलेला नाही. आतापर्यंत येथील २७ पैकी केवळ दोनच इमारतींवर कारवाई झाली आहे. येथील रहिवाशांनी एक महिन्याची मुदतवाढ मागितल्याचे पालिकेच्या सूत्रांचे म्हणणे आहे.मुंब्य्रातील शिळफाटा भागात झालेल्या लकी कंपाऊंड इमारत दुर्घटननंतर पालिकेने या भागात विशेष मोहीम आखून इमारतींवर कारवाईचा सपाटा सुरु केला होता. दोन वर्षापूर्वी या भागात तीन ते चार इमारतीं पडून सुमारे १५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे हा भाग, पालिकेच्या रडावर राहिला आहे. ३१ मे पर्यंत अतिधोकादायक इमारतींवर कारवाई करा, असे स्पष्ट आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते. जून महिन्यात पालिकेने विविध प्रभाग समितीमधील अतिधोकादायक इमारतींवर कारवाई करून आतापर्यंत ५८ पैकी ३६ इमारतींवर कारवाई केली. रोज विविध भागात ही कारवाई सुरुच आहे. अतिधोकादायक २७ इमारती या मुंब्रा प्रभाग समितीत आहेत. शिवाय या भागात अशा इमारतींची संख्याही तब्बल १४१९ एवढी आहे. पालिकेने आता या सर्व इमारतधारकांना नोटीसा पाठविण्यास सुरवात केली आहे. सुरवातीला बंदोबस्त मिळत नाही म्हणून कारवाईला ब्रेक लागला होता. परंतु आता पोलीस बंदोबस्त मिळत असला तरीदेखील, येथील रहिवाशांनी इमारती खाली करण्यास आणखी एक महिन्याची मुदत मागितली आहे. त्यामुळे कारवाईला पुन्हा एक महिन्याचा ब्रेक लागणार आहे. दरम्यान, ३१ मे पर्यंत अतिधोकादायक इमारतींवर कारवाई करा, असे स्पष्ट आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते. परंतु या कालावधीत तीन ते चार इमारतींवरच हातोडा पडला होता. जून महिन्यात आतापर्यंत ५८ पैकी ३६ इमारतींवर कारवाई केल्याची माहिती अतिक्रमण विभागाने दिली.