शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
5
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
6
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
7
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
8
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
9
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
10
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
11
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
12
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
13
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
14
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
15
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
16
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
17
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
18
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
19
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
20
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट

बीआरटी थांब्यासमोर खड्डा

By admin | Updated: September 20, 2016 02:00 IST

बीआरटी बसस्टॉपसमोर गेल्या एक महिन्यापासून ड्रेनेज पाइपलाइन फुटलेली असून, त्या ठिकाणी मोठा खड्डा खोदून ठेवलेला आहे.

येरवडा : येथील पर्णकुटी चौकानजीक कटारिया हॉस्पिटलसमोर आणि नगररोडकडे जाणाऱ्या येरवड्यातील पहिल्याच बीआरटी बसस्टॉपसमोर गेल्या एक महिन्यापासून ड्रेनेज पाइपलाइन फुटलेली असून, त्या ठिकाणी मोठा खड्डा खोदून ठेवलेला आहे. त्यामुळे ड्रेनेजचे पाणी त्या मोठ्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात साचल्याने त्या ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून, तेथील दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांना उग्र वासाला सामोरे जावे लागत आहे.सद्य:स्थितीत डेंगी तसेच चिकुनगुनिया या साथीच्या रोगांचा येरवडा परिसहासह संपूर्ण पुणे शहरात फैलाव झाला असल्याने सद्य:स्थितीत येथे असलेल्या परिस्थितीमुळे स्थानिक नागरिकांचे आणि कटारिया हॉस्पिटलच्या परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याच परिसरात तीन महत्त्वाच्या बँका असल्याने या बँकांमध्ये आर्थिक व्यवहार करण्यासाठी दररोज हजारो स्त्री-पुरुष नागरिक परिसरातून ये-जा करीत असतात. त्यांनाही ड्रेनेजलाइनच्या साठलेल्या या पाण्याच्या दुर्गंधीचा आणि अवस्छतेचा तसेच तेथील साठलेल्या पाण्यातील गेल्या एक महिन्यापासून वाढत झालेल्या डास आणि मच्छरांच्या प्रभावाचा स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात आरोग्यविषयक त्रास होत आहे. त्याच परिसरात प्रिन्स हॉटेल, प्रिन्स कपड्याचे दुकान, फळविक्रेते, पथारीवाले व्यवसाय करीत असतात. तेथे ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही या परिसरातील वातावरणाचा गंभीर त्रास होत आहे.तेथील खोदण्यात आलेल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये जे साचलेले ड्रेनेजचे पाणी आहे ते शेजारी राहणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या घरातील मैला, तसेच मलमूत्राचा पाइपलाइनमधून बाहेर पडत आहे. या सर्व परिस्थितीबाबत स्थानिक नगरसेवक संजय भोसले, नगरसेविका मीना परदेशी यांचे पती रवी परदेशी, येरवडा क्षेत्रीय कार्यालय ड्रेनेज विभागाचे संबंधित अधिकारी, विभागीय आरोग्याधिकारी, येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त आदी अधिकाऱ्यांना वारंवार आणि वेळोवेळी सांगूनही सर्वांनीच जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास येत आहे.याप्रकरणी लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही व्हावी, अन्यथा स्थानिक नागरिकांच्या वतीने पुणे महापालिकेवर तसेच येरवडा क्षेत्रीय कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. (वार्ताहर)दुर्गंधीयुक्त पाण्याची विल्हेवाट लावाया ठिकाणी खोदण्यात आलेल्या खड्ड्यातील ड्रेनेजलाइनच्या पाइपलाइनमधून बाहेर पडणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्याची रोजच्या रोज विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे खड्ड्यात साचलेल्या दुर्गंधीयुक्त व डास आणि मच्छरयुक्त पाण्यामध्ये औषध फवारणी करणे गरजेचे आहे. तसेच लवकरात लवकर तेथील ड्रेनेजलाइनची दुुरुस्ती करून खड्ड्याच्या जवळपास टाकण्यात आलेल्या पाइपलाइनची जोडणी त्वरित करावी आणि स्थानिक नागरिकांची होणारी वाहतुकीची तसेच आरोग्याची हेळसांड ताबडतोब थांबवावी, ही आमची स्थानिक नागरिकांच्या वतीने रास्त मागणी करण्यात आली आहे.