शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी आॅनलाइन नोंदणीसाठी शाळांमध्ये गर्दी

By admin | Updated: June 9, 2016 02:23 IST

दहावीच्या निकालानंतर अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची लगीनघाई सुरू झाली आहे.

मुंबई : दहावीच्या निकालानंतर अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची लगीनघाई सुरू झाली आहे. शाळांसह सायबर कॅफेमध्ये अर्ज भरण्यासाठी विद्यार्थी गर्दी करत असून बुधवारी नोंदणी अर्जांची संख्या एक लाखावर गेली आहे. तर पसंतीक्रम अर्ज भरताना नामांकित महाविद्यालये निवडण्यासाठी विद्यार्थी गेल्या वर्षीच्या कट आॅफची मदत घेत आहेत.गेल्यावर्षीच्या कट आॅफचा अंदाज यावर्षी कितपत मदतशीर ठरेल, हे पहिल्या गुणवत्ता यादीनंतरच कळणार आहे. मात्र मुंबई परिसरातील नामांकित महाविद्यालयांची यादी काढली असता, कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेची शेवटची कट आॅफ ९० टक्क्यांवर स्थिरावली होती. त्यात एसएससी बोर्डातून ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांत कमालीच घट झाली आहे. याउलट सीबीएसई बोर्डातून ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईतील नामांकित महाविद्यालयांतील मोक्याच्या जागांसाठी यंदा चांगलीच चुरस दिसणार आहे. (प्रतिनिधी)>आॅनलाईन प्रवेशासाठी अद्याप ९ दिवसांचा अवधी शिल्लक असून बुधवारपर्यंत १ लाख ३ हजार ५६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी अर्ज केल्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सांगितले. शिवाय ३२ हजार ९६९ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम अर्ज भरले आहेत. नोंदणी केलेल्या अर्जांत बुधवारपर्यंत १८ हजार ५५८ अर्ज निश्चित झाले असून ७९ हजार १२९ अर्जांनास्वीकृतीमिळाली आहे. याउलट पसंतीक्रम अर्जांमध्ये १५ हजार १४१ अर्ज निश्चितझाले आहेत.>चांगले कॉलेज मिळावे ही सगळ््यांचीच इच्छा असते. दरवर्षी कॉलेजांचे कट आॅफ वाढतात, त्याप्रमाणे प्रवेशामधील चुरसही वाढते. यासाठीच गेल्यावर्षीच्या कला, वाणिज्य, विज्ञान शाखांच्या टॉप ५ ‘कट आॅफ’ असलेल्या महाविद्यालयांबाबतची माहिती ‘लोकमत’ देत आहे. यामधून गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या महाविद्यालयाला पसंतीक्रम दर्शवताना नक्कीच मदत होईल.