शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारीसाठी ‘इच्छुकांची’ गर्दी

By admin | Updated: January 18, 2017 02:45 IST

मुंबई महापालिका निवडणुकांची घोषणा होताच आता उमेदवारीसाठी ‘इच्छुकांची’ही धावाधाव सुरू झाली आहे. एच ईस्ट वॉर्डमध्ये दहा प्रभाग येतात.

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांची घोषणा होताच आता उमेदवारीसाठी ‘इच्छुकांची’ही धावाधाव सुरू झाली आहे. एच ईस्ट वॉर्डमध्ये दहा प्रभाग येतात. या प्रभागात शिवसेनेकडून सर्वात जास्त इच्छुक उमेदवार असून त्यानंतर भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेचा नंबर लागतो. महत्त्वाची बाब म्हणजे काही प्रभागांत ज्या राजकीय पक्षांच्या नगरसेवकांचे चांगले बस्तान असूनही त्या पक्षातूनही इच्छुक उमेदवारांची यादी मोठी आहे. मुंबई उपनगरीय भागात एच ईस्ट वॉर्डमध्ये प्रभाग क्रमांक ८७ पासून प्रभाग क्रमांक ९६ येतो. या प्रभागांमध्ये पालिका निवडणुकीच्या उमेदवारीसाठी सध्या शिवसेनेकडून जवळपास ३0, भाजपाकडून २५, काँग्रेसकडून १७, राष्ट्रवादीकडून १३, मनसेकडून १६ पेक्षा अधिक उमेदवार इच्छुक आहेत. २0१२ साली झालेल्या पालिका निवडणुकीत एच ईस्ट वॉर्डमधील प्रभाग हे ८१ ते ९१ पर्यंत येत होते. या प्रभागांमध्ये फेरबदल होत आता ८७ ते ९६ पर्यंत प्रभाग क्रमांक येतात. २0१२ साली मनसेचे दोन, शिवसेनेचे चार, काँग्रेसचे तीन, भाजपाचा एक आणि एक अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. ज्या-ज्या भागात काही नगरसेवकांनी चांगली कामे करून आपले बस्तान बसवले आहे, अशा प्रभागांतही इच्छुकांची यादी चांगलीच मोठी आहे. इच्छुकांनीही आपल्या कामांची यादी तयार करून ती पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याची तयारी केली आहे. प्रभाग क्रमांक ९0, ९२, ९३ आणि प्रभाग क्रमांक ९४ महिलांसाठी आरक्षित आहे. त्यामुळे या भागात महिला इच्छुक उमेदवारांची संख्याही लक्षणीय आहे. या वॉर्डमध्ये शिवसेनेचे चांगलेच वर्चस्व असून त्यानंतर काँग्रेस व मनसेचा नंबर लागतो. भाजपाचा एकच उमेदवार या वॉर्डातून गेल्या पालिका निवडणुकीत निवडून आला होता. त्यामुळे भाजपाने एकला चलो रेची भूमिका घेतल्यास यंदा एच ईस्ट वॉर्डातील दहा प्रभागांत उमेदवार निवडताना शिवसेना, काँग्रेसचे मोठे आव्हान भाजपाला असेल. मनसे, सपाबरोबरच, आरपीआय, आप आणि एमआयएमकडूनही उमेदवार उभे केले जाणार असल्याने येथील लढत चांगलीच रंगतदार होईल. त्यामुळे शिवसेना, भाजपा, काँग्रेसला उमेदवार निवडून आणण्यासाठी आपली ताकद पणाला लावावी लागेल हे मात्र नक्की. (प्रतिनिधी)