शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

दारू खरेदीसाठी भोर शहरात गर्दी

By admin | Updated: April 6, 2017 00:54 IST

भोर शहरातील व आसपासची सात दुकाने, तर महामार्गावरील २६ अशी एकूण ३३ दारूची दुकाने बंद झाली आहेत.

भोर : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राष्ट्रीय महामार्गवर राज्य मार्गालगतच्या ५०० मीटर अंतरावरील परमिट रूम, बिअरबार, देशी दारू, बिअर शॉपीची दुकाने बंद करण्याचा निर्णय झाल्यामुळे भोर शहरातील व आसपासची सात दुकाने, तर महामार्गावरील २६ अशी एकूण ३३ दारूची दुकाने बंद झाली आहेत. मात्र, भोर शहरातील दोन वॉईनशॉप कायद्याच्या कचाट्यातून सुटल्याने भोर तालुक्यासह पुणे-सातारा महामार्गावरील व शिरवळ, खंडाळा येथील लोक दारूखरेदीसाठी शहरात एकच गर्दी करीत आहेत. एक एप्रिलनंतर उत्पादनशुल्क विभागाकडून दुकाने सील करण्यात आली. यात भोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाड-पंढरपूर रोडवरील दोन बिअरबार व एक बिअर शॉपी अशी तीन, तर भोर-कापूरव्होळ रोडवरील दोन बिअरबार अशी पाच दुकाने, राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील एक वॉईन शॉप, १४ बिअरबार व ११ बिशर शॉपी अशी २६ तर एकूण ३१ दुकानांना सील लागले आहे.ही दुकाने बंद झाल्याने कुठेच दारू मिळत नसल्याने तळीरामांची मोठी पंचाईत झाली आहे. मात्र, खंडाळा येथे एक बिअरबार व भोर शहरातील दोन वॉईनशॉप न्यायालयाच्या कायद्याच्या कचाट्यातून सुटले आहेत. भोर तालुक्यातील शहर व ग्रामीणसह महामार्गावरील तळीरामांनी आपला मोर्चा भोर शहरातील वॉईन शॉपकडे वळविला आहे. शहरातील दोन्ही दुकानांत एकच गर्दी होत आहे. तर, शासनाच्या या कारवाईनंतर अवैध देशी व हातभट्टी दारूविक्रीला ऊत आले आहे. (वार्ताहर)आता फार्म हाऊसवर जाऊन पार्ट्या न्यायालयाच्या निर्णयामुळे अवैध दारूधंदे बंद झाल्यामुळे दारू पिऊन पडणारे आणि दारूची दुकाने उघडण्याची वाट पाहणाऱ्यांचे प्रमाण कमी झालेले दिसत आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक गावांत अद्यापही देशी व हातभट्टी दारूची सर्रास विक्री होत आहे. महामार्गावरील बिअरबारमध्ये जाऊन मौैजमजा व पार्ट्या करणाऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली असून, त्यामुळे फार्म हाऊसवर जाऊन होणाऱ्या पार्ट्या वाढल्या आहेत.