शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

क्रॉस व्होटिंगचा राष्ट्रवादी, शिवसेनेला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2017 01:48 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभाग पद्धतीचा अवलंब केला

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभाग पद्धतीचा अवलंब केला होता. मात्र, पॅनल टू पॅनल मतदानाचे प्रमाण कमी होते. क्रॉस व्होटिंगचा फटका १९ प्रभागांतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे उमेदवारांना बसला आहे. तेरा प्रभागांत पॅनलला यश मिळाले असून यामध्ये भाजपााचे अकरा, राष्ट्रवादीचे दोन आहेत.महापालिका निवडणुकीसाठी राज्य सरकारने चार सदस्यीय पद्धती अवलंबण्यात आली. बहुसदस्यीय पद्धत ही राष्ट्रीय पक्षांसाठी फायद्याची तर छोटे पक्ष आणि अपक्षांचे प्रमाण कमी करणारी होती. त्यामुळे बहुसदस्यीय पद्धतीस राज्य सरकारने मान्यता दिली होती. याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि मनसेला बसला आहे. प्रभाग क्रमांक एकमध्ये क्रॉस व्होटिंग झाल्याने १ अपक्ष, १ राष्ट्रवादी आणि २ भाजपा अशी स्थिती आहे. तीनमध्ये भाजपा ३, तर राष्ट्रवादी १, पाच व दहामध्ये भाजपा व राष्ट्रवादी प्रत्येकी २, आठमध्ये भाजपा ३, तर राष्ट्रवादी १, तेरामध्ये भाजपा २, तर राष्ट्रवादी व मनसे प्रत्येकी १. चौदामध्ये राष्ट्रवादी व शिवसेना प्रत्येकी २, पंधरामध्ये भाजपा २, राष्ट्रवादी व शिवसेना प्रत्यकी १, सोळामध्ये भाजपा २ व राष्ट्रवादी २, अठरामध्ये भाजपा २, राष्ट्रवादी व शिवसेना प्रत्येकी १, वीस आणि एकवीसमध्ये राष्ट्रवादी ३, तर भाजपा १, बाविसमध्ये राष्ट्रवादी ३, तर अपक्ष १, तेवीसमध्ये भाजपा ३ तर, अपक्ष १, प्रभाग क्रमांक चोविसध्ये शिवसेना २, भाजपा १ व अपक्ष १, पंचवीसमध्ये शिवसेना ३ व राष्ट्रवादी १, अठ्ठावीसमध्ये भाजपा २ व राष्ट्रवादी २, तीसमध्ये राष्ट्रवादी ३ व भाजपा १, तर प्रभाग क्रमांक एकतीसमध्ये भाजपा ३ व अपक्ष १ असे क्रॉस व्होटिंग झाले आहे. गेल्या वेळची महापालिका निवडणूक द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार झाली होती. (प्रतिनिधी)>दिग्गज नगरसेवक बसले घरीक्रॉस व्होटिंगचा फटका दिग्गजांना बसला आहे. उपमहापौर प्रभाकर वाघेरे, भाजपाच्या शैला मोळक, शिवसेना गटनेत्या सुलभा उबाळे, मनसेच्या अश्विनी चिखले, माजी महापौर आर. एस. कुमार, राष्ट्रवादी माजी शहराध्यक्ष वसंत लोंढे, नारायण बहिरवाडे, संजय वाबळे, उल्हास शेट्टी, तानाजी खाडे, अ‍ॅड. संदीप चिंचवडे, रिपाइंच्या चंद्रकांता सोनकांबळे, भाजपाचे सुरेश म्हेत्रे, शांताराम भालेकर यांचा समावेश आहे.