शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

सिंचन विहिरीत कोटींचा घपला

By admin | Updated: February 27, 2017 03:06 IST

२०११-१२ मध्ये मंजूर झालेल्या ६०७ विहिरींपैकी शेकडो विहिरी कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दाखवून करोडो रुपयांचा घपला केल्याचा आरोप मनसेने केला

विक्रमगड : या तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत सन - २०११-१२ मध्ये मंजूर झालेल्या ६०७ विहिरींपैकी शेकडो विहिरी कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दाखवून करोडो रुपयांचा घपला केल्याचा आरोप मनसेने केला आहे. असंख्य लाभार्थ्यांना विहिरींचे अनुदान देण्यात आलेले नाही. एका विहीरीचा खर्च १ लाख ९० हजार रुपये असल्याने यात कोटयवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेचे परेश रोडगे यांनी केलेल्या तपासणीमध्ये आढळल्याचे त्यांनी म्हटले असून या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी ते शुक्रवार पासून उपोषण करणार आहेत. त्यांनी सहा महिन्यापूर्वी याबाबत चौकशीची मागणी करणारे पत्र गट विकास अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र त्यावर काहीच कारवाई झाली नसल्याने अखेर त्यांनी ३ मार्च रोजी न्यायासाठी उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे़सन-२०११-१२ या आर्थिक वर्षातील सिंचन विहीरींंमध्ये झालेल्या भ्रष्टांचाराची चौकशीसाठी पत्र दिले होते त्याअनुषंगाने पाठपुरावा देखील करण्यात आलेला होता त्यानुसार गट विकास अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता आर. एस. अभंगराव व एस एन पाटील, लघु पा़टबंधारे विभागाचे शाखा अभियंता के ज़े़ संखे, एस एस शेख, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे तांत्रिक अधिकारी बी एम पाटील व एस एस गांगोडा यांना दिले होते. मात्र ७ महिन्याच्या कालावधीमध्ये काहीच हालचाल न झाल्याने १३ डिसेंबर २०१६ रोजी तालुका मनसेच्यावतीने घंटानाद आंदोलन करण्याच इशारा देण्यात आला होता़ परंतु त्यावेळी गट विकास अधिकाऱ्यांंनी २० डिसेंबर रोजी १ महिन्याची मुदत कारवाई करण्यासाठी मागितली व तसे लेखी आश्वासन मनसेला दिले होते त्यानुसार हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र हा ही कालावधी निघून गेला असून आजतागायत कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नसल्याने ३ मार्च रोजी उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आल्याचे जिल्हा सचिव सतीश जाधव यांनी सांगितले आहे़ आता संबंधीत खात्याचे अधिकारी कोणती कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)>अशी आहे दारुण वस्तुस्थितीसन-२०११-१२ मध्ये ६०७ सिंचन विहीरींचे कामे हाती घेण्यात आली होती त्याअनुषंगाने आॅनलाईन रेकॉर्डवर ४३६ विहीरी पूर्ण झाल्याचे दाखविले आहे़ तर ५७ विहींरीची कामे अपूर्ण आहेत व ८ विहीरींची कामे सुरु नाही तर १०८ विहीरंी रदद केल्याचे दाखविले आहे़ याकरीता ६ कोटी ५० लाख रुपये खर्च झाल्याचेही दाखविले आहे़ मात्र ही रक्कम लाभार्थ्यांना मिळालेली नाही, मनसेकडून करण्यांत आलेल्या सर्व्हेनुसार फक्त १४५ विहीरींची कामे पूर्ण झाली असून बाकी सर्व विहीरी अपूर्णच आहेत. त्यासाठीची जवळ जवळ १२ कोटी ५० लाखांची रक्कम काढली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे़ तालुक्यातील ६०७ विहीरींपैकी सर्वच विहीरींची कामे अपुर्ण आहेत, एका विहीरीस 1कोटी ९० हजार रुपये मंजूरी असल्याने व ही कामे न करतांच संपूर्ण निधी काढलेला दिसत आहे़. त्यामुळे जवळ जवळ १२ कोटी ५० लाखांचा भ्रष्टांचार झाल्याचा आमचा आरोप आहे व त्याप्रमाणे चौकशी होणे गरजेचे आहे़-परेश रोडगे, मनसे तालुका विक्रमगडहा प्रकार सन-2011-12 मधील असून मी आताच नव्याने प्रभारी चार्ज घेतलेला आहे़ तसेच याबाबत त्यावेळेस तपासण्या झालेल्या असून त्यांचा अहवाल सादर केलेला नाही, या विभागामध्ये काम करणाऱ्या अभियंत्यांकडे तीनतीन तालुक्यांचा भार असून ते देखील प्रभारीच आहेत़ तसेच या विभागातील सर्वच पदे रिक्त असल्याने याबाबतचे काम थोडे हळू चालू आहे़ मात्र सखोल चौकशी होईल़-प्रदिप डोल्हारे,प्ऱ गटविकास अधिकारी प़ं स़ विक्रमगड